'ऑपरेशन टायगर'ला 'टायगर जिंदा हैं' म्हणत उत्तर... ठाकरेंच्या खासदारांनी दिल्लीत एकत्र पत्रकार परिषदेत घेत दिली गॅरंटी
भाजप आणि शिंदे यांच्यात वाद सुरू आहेत, म्हणूनच ते अशा अफवा पसरवतायत असं अरविंद सावंत म्हणाले. संसदेचं अधिवेशन सुरू आहे. ज्यांची जमीन हादरतेय ते या सर्व अफवा पसरवत आहेत. राज्यातील काही घटनांमुळे राज्याची बदनामी होतेय असा आरोपही अरविंद सावंत यांनी केला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

उद्धव ठाकरेंच्या 7 खासदारांची दिल्लीत पत्रकार परिषद

ठाकरेंची साथ सोडणार नाही, ठाकरेंच्या 7 खासदारांचा शब्द

ऑपरेशन टायगरच्या चर्चेचं कारण वेगळं, काय म्हणाले सावंत?
Shiv Sena Operation Tiger : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदेचे खासदार नरेश म्हस्के यांनी दावा केलाय की उद्धव ठाकरेंच्या पक्षातील काही खासदार आमच्यात सामील होणार आहेत. "कारवा बढते जा रहा हैं... लोक सामील होत आहेत, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या जे हिंदुत्वाच्या विचारसरणीवर विश्वास ठेवणारे, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर विश्वास ठेवणारे लोक आहेत, ते सर्वजण आमच्यात सामील होणार आहेत." एकूणच नरेश म्हस्के, उदय सामंत आणि इतर काही शिवसेना नेत्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे राज्यात ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू आहे. मात्र, याला आता उद्धव ठाकरेंच्या खासदारांनी उत्तर दिलंय.
हे ही वाचा >>Sangli : चिमुकलीवर बलात्कार केला, हत्या करून मृतदेह लपवला, आरोपीने कुटुंबासमोर मुलीला शोधण्याचं नाटकही केलं
नरेश म्हस्के पुढे म्हणाले, "हे लोक काँग्रेसचे गुलाम झाले आहेत. त्यांना काँग्रेस जसं नाचवते तसंच ते नाचतात. संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे तीन जण सोडून इतर सगळे आमच्याकडे येणार आहेत. पुढे काय होते ते पाहा..." नरेश म्हस्के यांनी केलेल्या संपूर्ण आरोपांवर आता ठाकरेंच्या खासदारांनी दिल्लीत एकत्रित पत्रकार परिषद घेत उत्तर दिलं आहे. आम्ही सर्व खासदार हे उद्धव ठाकरे यांच्याच सोबत आहोत असं नरेश म्हस्के यांनी सांगितलं आहे.
अरविंद सावंत म्हणाले, संसदेचं अधिवेशन सुरू आहे. ज्यांची जमीन हादरतेय ते या सर्व अफवा पसरवत आहेत. भाजप आणि शिंदे यांच्यात वाद सुरू आहे. म्हणूनच ते अशा अफवा पसरवतायत. त्यांना महाराष्ट्र व्यवस्थित चालवता येत नाहीये, म्हणूनच हे लोक अफवा पसरवत आहेत. आम्ही सर्व खासदार उद्धव ठाकरेंच्या सोबत आहोत असं अरविंद सावंत म्हणालेत."
हे ही वाचा >>Kumbh Mela Fire : कुंभ मेळ्यात तिसऱ्यांदा लागली आग, मंडप पेटले, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी
राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. धनंजय मुंडे यांच्यावरच्या आरोपांवर राज्याची बदनामी होतेय. बदलापूरमध्ये पुन्हा एका चिमुकलीवर बलात्कार झालाय. हे सगळं सुरू असल्यानं लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी ऑपरेशन टायगरच्या चर्चा सुरू आहेत. मात्र, टायगर अभी जिंदा है असं म्हणत ठाकरेंच्या खासदारांनी उत्तर दिलंय.