Manikrao Kokate यांची आमदारकी रद्द कधी करणार? 'त्या' प्रकरणाचा उल्लेख, विधानसभा अध्यक्षांना सवाल
राहुल गांधी यांची खासदारकी २४ तासांत रद्द करण्यात आली. सुनील केदार यांना यांची आमदारकी 24 तासांत आमदारकी रद्द केली. आता, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची आमदारकी रद्दचा आदेश विधानसभा अध्यक्ष कधी काढणार आहे? असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केलाय.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

"राहुल गांधी यांची खासदारकी २४ तासांत रद्द करण्यात आली"

कोकाटेंच्या आमदारकी रद्दचा आदेश कधी काढणार? : वडेट्टीवार

"आम्ही करू तो न्याय आणि आम्ही देऊ तो दंड‘ ही सत्तेची मस्ती नाही तर काय ?"
मंत्री धनंजय मुंडे यांच्यानंतर आता राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे सुद्धा अडचणीत सापडले आहेत कारण माणिकराव कोकाटे आणि भाऊ सुनील कोकाटे यांना कोर्टानं मोठा दणका दिलाय.वर्ष 1995 मध्ये कागदपत्रांची फेरफार आणि फसवणुकीच्या आरोपाखाली माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने 2 वर्षांचा कारावास आणि 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्यामुळे आता माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद अडचणीत आलं आहे. यावरुन आता विरोधकांनी त्यांच्यावर टीका करायला सुरूवात केली असून, तांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. विजय वडेट्टीवार यांनी राहुल गांधीवर झालेल्या कारवाईचं उदाहरण देत कोकाटेंची आमदारकी रद्द करण्याचा निर्णय कधी घेणार असा सवाल त्यांनी विधानसभा अध्यक्षांना केला आहे.
विजय वडेट्टीवार काय म्हणाले?
हे ही वाचा >> Mumbai : बंगले मिळूनही मंत्री आमदार निवासच्या खोल्या सोडेनात, नव्या आमदारांमध्ये खोल्यांसाठी वाद?
"मानहानी प्रकरणात न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची खासदारकी २४ तासांत रद्द करण्यात आली. सुनील केदार यांना शिक्षा सुनावल्यानंतर महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांनी 24 तासांत आमदारकी रद्द केली. आता, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची आमदारकी रद्दचा आदेश विधानसभा अध्यक्ष कधी काढणार आहे? धनंजय मुंडे यांच्यावर आरोप सिद्ध झालेले नाहीत म्हणून राजीनामा घेऊ शकत नाही, असे म्हणणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अजूनही कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा का घेतलेला नाही? त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाले, न्यायालयाने शिक्षा सुनावली, तरी त्यांचा राजीनामा घेतला गेला नाही! सत्ता आहे म्हणून ‘आम्ही करू तो न्याय आणि आम्ही देऊ तो दंड‘ ही सत्तेची मस्ती नाही तर आणखी काय ?" असं वडेट्टीवार म्हणाले आहेत.
हे ही वाचा >> Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांना झालेला Bells Palsy आजार नेमका काय? लक्षणं आणि त्रास नेमका काय?
दरम्यान, माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयात सुनावणी पार पडली. दरम्यान, नाशिक जिल्हा न्यायालयाने कोकाटे यांना दणका दिला आहे.अशातच काँग्रेसचे नेते आणि माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ट्वीटरच्या माध्यमातून महायुती सरकारवर हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केलीय.