Health Fitness : उलटं चालण्यामुळे हाडे मजबूत होतात? समज की गैरसमज? वाचा सविस्तर...
लोक हाडांना बळकट करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करतात. पण एक सामान्य समजूत अशीही आहे की उलटे मागे चालल्याने हाडे मजबूत होतात. यामुळे काही लोक सतत उलटे चालण्याचा प्रयत्न करतात.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

उलटे चाललन्याने हाडे मजबूत होतात?

लोकांमध्ये असलेला हा समज की गैरसमज?

हाडे मजबूत होण्यासाठी काय केले पाहिजे?
जर तुम्हाला दीर्घकाळ आणि निरोगी आयुष्य जगायचं असेल, तर तुम्हाला तुमच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. तुमच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या आहारात आणि जीवनशैलीत अनेक बदल करावे लागतील. हे सर्व केल्यानंतर तुमची हाडं मजबूत होतील, तेव्हाच तुम्हाला निरोगी म्हटलं जाऊ शकतं.
जर तुमची हाडे कमकुवत असतील, तर तुमच्या फक्त दैनंदिन दिनचर्येवरच परिणाम होत नाही, तर तुम्हाला अनेक प्रकारच्या आरोग्य समस्यांनाही तोंड द्यावं लागतं. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला निरोगी जीवन जगायचं असेल तर तुमची हाडं मजबूत ठेवणं खूप महत्वाचे आहे.
हे ही वाचा >>Kitchen Tips : कच्चे अंडे किती वेळ उकडले पाहिजे? अंडी उकडण्याची योग्य पद्धत कोणती? जाणून घ्या
लोक हाडांना बळकट करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करतात. पण एक सामान्य समजूत अशीही आहे की उलटे मागे चालल्याने हाडे मजबूत होतात. यामुळे काही लोक सतत उलटे चालण्याचा प्रयत्न करतात. पण कुणी कधी विचार केला आहे का? की उलटं चालल्यानं खरोखरच हाडं मजबूत होतात का? या प्रश्नाचं ऑर्थोपेडिक डॉक्टर सुजॉय कुमार भट्टाचार्य यांनी काय उत्तर दिलं आहे ते पाहू.
मागे चालणं खरोखर फायदेशीर?
असं म्हटलं जातं की, मागे चालल्यानं सांध्यांमधील हाडांवर दबाव कमी होतो आणि हाडांची हालचाल होते. यामुळे हाडे मजबूत होतात. तसंच डॉ. सुजॉय कुमार भट्टाचार्य यांनी याला फक्त एक फॅशन म्हटलं आणि ही वस्तुस्थिती पूर्णपणे नाकारली. ते म्हणाले, 'आजकाल कोणतीही गोष्ट फॅशन बनते. उलटे चालण्याने हाडे मजबूत होतात असं म्हणणं मूर्खपणाचं आहे. याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही. हाडं मजबूत करण्यासाठी उलटे चालण्याची गरज नाही.
हाडे मजबूत करण्यासाठी काय करावे?
हे ही वाचा >>Health Tips: रात्री 10 नंतर 'हे' पदार्थ खाल्ले तर वाटच लागेल!
डॉ. सुजॉय म्हणतात की हाडे मजबूत करण्याचे अनेक मार्ग आहेत. यापैकी सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही दररोज किमान 30 मिनिटं कोणत्याही प्रकारची शारीरिक हालचाल करण्यामुळे तुमच्या हाडांचे आरोग्य तर सुधारतंच, पण तुमचं एकूण आरोग्यही सुधारतं.
वेगाने चालणे, सायकलिंग, पोहणे किंवा जॉगिंग यासारख्या व्यायामामुळे हाडांची हालचाल होते, तुम्हाला घाम येतो आणि त्याचा हाडांना तसंच एकूण आरोग्याला फायदा होतो.