Bank बुडाल्यानंतर ठेवीदारांच्या पैशांचं काय होतं? जाणून घ्या भारतातील नियम
अमेरिकेतील बँकिंग संकट आणि त्याचा अमेरिकेसह युरोपमध्ये झालेला परिणाम हा मुद्दा सध्या चर्चेत आहे. अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली बँक (Silicon Valley Bank) बुडल्यानंतर हा मुद्दा चर्चेत आला आहे. पण या बँका बुडाल्यानंतर बँकांच्या ग्राहकांच्या मनात काही प्रश्न निर्माण होतात ते म्हणजे त्यांच्या पैशांचे काय होणार? त्यांचे पैसे परत मिळणार का? मिळाले तर किती मिळणार? आणि कधी […]
ADVERTISEMENT
अमेरिकेतील बँकिंग संकट आणि त्याचा अमेरिकेसह युरोपमध्ये झालेला परिणाम हा मुद्दा सध्या चर्चेत आहे. अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली बँक (Silicon Valley Bank) बुडल्यानंतर हा मुद्दा चर्चेत आला आहे. पण या बँका बुडाल्यानंतर बँकांच्या ग्राहकांच्या मनात काही प्रश्न निर्माण होतात ते म्हणजे त्यांच्या पैशांचे काय होणार? त्यांचे पैसे परत मिळणार का? मिळाले तर किती मिळणार? आणि कधी मिळणार?
ADVERTISEMENT
अमेरिकी नियामक आणि सरकार या दोघांकडूनही ग्राहकांच्या पैसे परत मिळण्याबाबत खात्री देण्यात आली आहे. पण हे पैसे कधी आणि कसे परत मिळणार? याचं मात्र उत्तर कोणाकडे नाही. भारतातही (India) मागील काही काळात अशा अनेक बँका बुडाल्याच्या किंवा दिवाळखोरीत निघाल्याची उदाहरणं आहेत. त्यामुळे बँका बुडाल्यानंतर पैशांचे काय? हा प्रश्न भारतीय खातेधारकांच्या मनातही तयार होतो. (What happens to customers’ money when a bank collapses)
अमेरिकेत बँक बुडाल्यानंतर काय आहे नियम?
अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली बँका बंद झाल्यानंतर लगेचच राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशनने (FDIC) ग्राहकांना त्यांच्या ठेवी परत मिळतील असं आश्वासन दिलं आहे. पण जर आपण FDIC च्या नियमांवर नजर टाकली तर, अमेरिकेत, बँक बुडल्यास ठेवीदारांना बँकेत 2.5 लाख डॉलरपर्यंतचा ठेव विमा मिळतो. म्हणजेच, ग्राहकांना त्यांच्या एकूण ठेवीपैकी 2.5 लाख डॉलरपर्यंतची रक्कम हमखास मिळू शकते.
हे वाचलं का?
भारतातील खातेधारकांना एवढी रक्कम मिळते :
भारतातही, बँक बुडाल्यास ग्राहकांसाठी ठेव विम्याची सुविधा 60 च्या दशकापासून तरतुद आहे. देशातील ठेव विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC), रिझर्व्ह बँकेच्या अंतर्गत ग्राहकांना त्यांच्या ठेवींवर विमा संरक्षण प्रदान करते. 4 फेब्रुवारी 2020 पूर्वी, भारतातील बँक ठेवींवर ठेव विमा फक्त 1 लाख रुपये होता. म्हणजे तुमच्या बँकेत ठेवी जरी 10 लाखांपेक्षा जास्त असली तरी बँक बंद पडली किंवा बुडली तर तुम्हाला फक्त 1 लाखापर्यंतची रक्कम परत मिळायची.
पण मोदी सरकारने हा नियम बदलला आणि ठेव विमा संरक्षण एक लाखावरून 5 लाख रुपये केले. म्हणजेच आता ग्राहकांचा 5 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवीचा विमा उतरवला जातो. त्यानंतर ज्या तारखेला बँकेचा परवाना रद्द किंवा बँक बंद झाल्याची घोषणा केली जाते, त्या तारखेला ग्राहकाला त्याच्या खात्यातील ठेव आणि व्याजातून जास्तीत जास्त पाच लाख मिळू शकतात.
ADVERTISEMENT
Raj Thackeray स्वतःचं वर्तमानपत्र काढणार? मुलाखतीमध्ये मोठा दावा
ADVERTISEMENT
90 दिवसांत प्रक्रिया करावी लागते पूर्ण :
ठेव विमा प्रणालीमध्ये बचत खाते, चालू खाते, आवर्ती खाते यासह सर्व प्रकारच्या ठेवींमध्ये जमा केलेल्या रकमेवर विमा संरक्षण दिले जाते. इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या नियमानुसार, विम्याअंतर्गत, बँक बुडाल्याच्या 90 दिवसांच्या आत खातेदारांना पैसे परत मिळतात. म्हणजेच, निर्धारित वेळेत, ग्राहकांना जमा केलेल्या रकमेवर निश्चित विमा रक्कम दिली जाते. या प्रक्रियेवर नजर टाकल्यास अडचणीत सापडलेली बँक पहिल्या ४५ दिवसांत विमा महामंडळाकडे सोपवली जाते. ठरावाची वाट न पाहता ९० दिवसांत प्रक्रिया पूर्ण होते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT