एकनाथ शिंदेंचा सामना कसा करणार?; ठाण्याचे नवे जिल्हाप्रमुख केदार दिघेंनी दिलं उत्तर
एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात शिवसेनेची पक्षबांधणी करण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाच्या नियुक्त्या केल्या आहेत. ठाणे जिल्हाप्रमुख म्हणून केदार दिघे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांचं वर्चस्व असून, केदार दिघेंचा राजकीय सामना थेट शिंदेंसोबत असणार आहे. यापार्श्वभूमीवर त्यांची घेतलेली मुलाखत… एकनाथ शिंदेंचा सामना कसा करणार यावर केदार दिघे काय म्हणाले? […]
ADVERTISEMENT
एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात शिवसेनेची पक्षबांधणी करण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाच्या नियुक्त्या केल्या आहेत. ठाणे जिल्हाप्रमुख म्हणून केदार दिघे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांचं वर्चस्व असून, केदार दिघेंचा राजकीय सामना थेट शिंदेंसोबत असणार आहे. यापार्श्वभूमीवर त्यांची घेतलेली मुलाखत…
ADVERTISEMENT
एकनाथ शिंदेंचा सामना कसा करणार यावर केदार दिघे काय म्हणाले?
एकनाथ शिंदेंचा सामना कसा करणार, असा प्रश्न ठाण्याचे नवनियुक्त जिल्हाप्रमुख केदार दिघे यांना विचारण्यात आला. त्यावर दिघे म्हणाले, “शिवसेना ही संघटना संघर्षातून घडली आहे. प्रत्येक शिवसैनिकाला संघर्ष काही नवीन नाही. आनंद दिघे यांनी सुरूवातीच्या काळात प्रचंड संघर्ष केला. आयुष्यभर एकनिष्ठ राहिले. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांची निष्ठा भगव्याशी होती. त्यांचे (आनंद दिघे) आशीर्वाद घेऊन तळागाळापर्यंत पोहोचण्याचं आणि जनसामान्यांची सेवा करण्याचं व्रत घेतलेलं आहे.”
“हे आपण बघतोय, पण जेव्हा शिवसैनिकांची साथ असते तेव्हा कितीही मोठा संघर्ष समोर असला, तरी सोपा जातो. शिवसैनिक तयार आहेत. खूप लहान वयात मला जिल्हाप्रमुख पद मिळालं. याबद्दल मी आभारी आहे. जुन्या शिवसैनिकांनी शिवसेना बांधली, त्यामुळे मला हे मिळालं आहे.”
हे वाचलं का?
मातोश्रीसाठी प्राण द्यायलाही तयार; अनिता बिर्जे एकनाथ शिंदेंच्या बंडाबद्दल काय म्हणाल्या?
“शिवसेना ही कुणाची मक्तेदारी नाही. शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांनी घडलेली आहे. आनंद दिघे यांच्यासारख्या कार्यकर्त्यामुळे घडली आहे. शिवसैनिक हा शिवसैनिक असतो. फोटो झाकले काय आणि न झाकले काय त्यांचा विचार ठाम असतो. शिवसैनिक उद्धव ठाकरे आणि हिंदुत्वाचा विचार घेऊन पुढे जातील”, असं केदार दिघे यांनी सांगितलं.
ADVERTISEMENT
एकनाथ शिंदे यांच्यासोबत न जाता उद्धव ठाकरेंसोबत राहणं पसंत केलं. यामागे काय कारण? या प्रश्नावर केदार दिघे म्हणाले, “यामागे संस्काराची गोष्ट आहे. माझ्यावरती आनंद दिघे यांचे संस्कार झाले आहेत. त्यामुळे पक्षाशी एकनिष्ठ, पक्षाच्या नेत्याशी एकनिष्ठ आणि बाळासाहेबांचा विचार अंगीकारून पुढे जाणं, हे सगळे संस्कार बोलतात”, असं केदार दिघे म्हणाले.
ADVERTISEMENT
‘शिवसेना आता संपण्याच्या वाटेवरच’;भाजपाध्यक्ष जेपी नड्डा कार्यकर्त्यांसमोर काय बोलले?
“आमचीच शिवसेना खरी असल्याचा दावा एकनाथ शिंदेंकडून केला जातोय. खरी शिवसेना बाळासाहेबांची होती. विचारांचा वारसा घेऊन चाललोय, असं जर ते म्हणत असतील मी त्यांना शुभेच्छा देतो. त्या विचारांना जागूनच ते काय करून बसले आहेत, याचा त्यांनी पुन्हा एकदा विचार करावा,” असं ठाण्याचे जिल्हाप्रमुख केदार दिघे हे एकनाथ शिंदे यांना म्हणाले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT