Sindhudurga: शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याचं नेमकं कारण आलं समोर, वकिलांनी दिली मोठी माहिती

मुंबई तक

ADVERTISEMENT

निकृष्ट दर्जाचं स्टील वापरल्यामुळे मालवणातील राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला असल्याचा युक्तिवाद कोर्टात करण्यात आलं असून या प्रकरणी ओरोस न्यायालयाने चेतन पाटील याच्या जामिन अर्ज नाकारला आहे.

social share
google news

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्गातील मालवणमधील शिवाजी महाराजांचा जो पुतळा कोसळला त्याबाबत आता एक नवी माहिती समोर आली आहे. पुतळा बनवताना त्यामध्ये अत्यंत निकृष्ट दर्जाचं स्टील वापरण्यात आलं होतं.खरंतर पुतळ्यासाठी स्टेनलेस स्टील वापरायला हवं होतं. पण ते वापरलं गेलं नाही आणि त्याऐवजी लोखंड वापरण्यात आलं. हीच बाब सरकारी वकिलांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिली. ज्यामुळे कोर्टाने आरोपींचा जामीन नाकारला आहे. सरकारी वकील गजानन तोडकरी यांनी याबाबत नेमकी माहिती दिली आहे.ओरोस येथील जिल्हा सत्र न्यायालयात आज चेतन पाटील याच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. यानंतर जिल्हा सत्र न्यायालयाने चेतन पाटील याचा जामीन अर्ज फेटाळला.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT