Sachin Pilot : पायलटांसाठी वेगळी वाट अवघड, पण काँग्रेस का टाळतेय कारवाई? समजून घ्या 5 मुद्द्यात

मुंबई तक

ADVERTISEMENT

why is it not easy for congress to action on sachin pilot
why is it not easy for congress to action on sachin pilot
social share
google news

sachin pilot protest : राजस्थान विधानसभा निवडणूकीपुर्वी कॉंग्रेससमोर पुन्हा राजकीय संकट निर्माण झाले आहे. कारण मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) आणि सचिन पायलट (Sachin Pilot) यांच्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. पायलट यांनी आपल्याच सत्ताधारी पक्षाविरोधात जयपूरमध्ये एकदिवसीय आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे कॉग्रेससमोर मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. दरम्यान आता कॉग्रेस पक्षाविरोधात आंदोलन केल्याप्रकरणी सचिन पायलट यांच्यावर कारवाई करणार की पायलट यांनी केलेल्या वसुंधरा राजे (Vasundhara Raje) सरकारच्या कार्यकाळातील भ्रष्टाचारावर कारवाई करणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (why is it not easy for congress to action on sachin pilot understand in 5 points)

ADVERTISEMENT

सचिन पायलट यांना कॉंग्रेसचा इशारा

वसुंधरा राजे (Vasundhara Raje)सरकारच्या कार्यकाळात झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणात राज्य सरकारने कोणतीही कारवाई केली नसल्याने पायलट यांनी मंगळवारी एकदिवसीय उपोषणाची घोषणा केली होती.त्यानुसार पायलट (Sachin Pilot) जयपुरमधली शहिद स्मारक येथे उपोषणास बसले आहेत.

पायलट (Sachin Pilot) यांनी उपोषण केल्यास त्याच्या पक्षाच्या विरोधी भूमिकेबाबत विचार केला जाईल. पायलट आता जी पावले उचलत आहेत ती केवळ गेहलोत विरोधात नाही तर पक्षाविरोधात असल्याचेही राजस्थान कॉंग्रेसचे प्रभारी सुखजिंदर सिंह रंधावा यांनी सांगितले होते. कॉंग्रेस भ्रष्टाचारविरूद्ध लढत आहे. पायलटने आधी आमच्याशी बोलायला हवे होते. आम्ही सीएमशी बोललो असतो आणि त्यानंतरही कारवाई झाली नाही, तर त्यांना उपोषणाचा अधिकार आहे. दरम्यान हा मुद्दा पक्षात मांडण्याऐवजी पायलट त्यांनी थेट उपोषणाचा मार्ग निवडला, जो योग्य नाही असे मत रंधाना यांनी मांडलेय.

हे वाचलं का?

हे ही वाचा : शरद पवारांना आयोगाने का दिला धक्का? राष्ट्रवादीचा ‘राष्ट्रीय दर्जा’ जाण्यामागची ‘ही’ आहेत कारण

पायलट यांच्यावर आंदोलनाची वेळ का आलीय?

वसुंधरा सरकारमधील खान महाघोटाळा, भ्रष्टाचार, 90 बी घोटाळा, बाजरी, खाण माफिया यांसह अनेक घोटाळ्याचा निवडणूकीचा मुद्दा बनवून कॉग्रेस सत्तेत आली होती. गेहलोत यांनी स्वत: कॉंग्रेसची सरकार आल्यास तपास करून आरोपींना तूरूंगवास घडवू असे म्हटले होते. मात्र सत्तेत आल्यापासून एकाही घोटाळ्यातील प्रकरणात कारवाई करण्यात आली नसल्याने पायलट यांनी एकदिवसीय उपोषणाची घोषणा केली होती.

पायलट(Sachin Pilot) यांना मुख्यमंत्री गेहलोत आणि भाजप नेत्या वसुंधरा राजे यांच्यातील राजकीय संबंधाची माहिती आहे. त्यामुळे या प्रकरणात जर पायलट यांनी जोर दिला तर त्यांना मागे खेचणे अवघड जाणार आहे. दरम्यान माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या भ्रष्टाचाराबाबात पायलट यांना मांडलेल्या मागणीने केंद्रीय नेतृत्वाला विचार करायला भाग पाडले आहे.

ADVERTISEMENT

पायलटवर कारवाई शक्य आहे का?

पायलट (Sachin Pilot) यांच्यावर कारवाई करणे कॉंग्रेससाठी इतके सोप्पे नसणार आहे. यामागचे पहिले कारण म्हणजे, पायलट यांचा राजकीय ग्राफ आणि तरूण मतदारांमधील प्रतिमा अधिक चांगली आहे. त्याच्यावर कारवाई करून कॉग्रेसला राजस्थानमधील भविष्यातील राजकीय वाटचाल अवघड करायची नाही आहे.

ADVERTISEMENT

दुसरे कारण म्हणजे, 25 डिसेंबर 2022 ला मल्लिकार्जुन खर्गे आणि अजय माकन यांच्या उपस्थितीत समांतर सभा घेतलेल्या गेहलोत यांच्या जवळच्या नेत्यांवर अनुशासनहीन कारवाई करण्यात आली नाही. शांती धारीवाल, पाणी पुरवठा मंत्री महेंद्र जोशी आणि धर्मेंद्र राठोड यांनी अनुशासन भंग केल्याबदद्ल नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. मात्र अद्याप त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. अशात भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी आंदोलनाला बसलेल्या पायलट यांच्यावर कारवाई करणे सोपे जाणार नाही.

हे ही वाचा : शिंदे यांना हा दावा मान्य आहे? नसेल तर…; संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांना चॅलेंज

कॉग्रेस गेहलोत यांना पाठिंबा का देतेय?

अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांच्यात कॉग्रेस आपले वर्तमान पाहतेय. त्यामुळे कॉग्रेस पंजाब प्रमाणे निवडणूकीचा तोंडावर मुख्यमंत्री बदलून जोखीम उचलू इच्छित नाही आहे. कॅप्टन अमरिंगर सिंह याच्या जागी चरणजीत चन्नी यांना घेऊन कॉंग्रेस सत्तेत आली होती. अशा स्थितीत निवडणूकीच्या रणधुमाळीत राजस्थानमध्ये मुख्यमंत्री बदलण्याचा डाव महागात पडू शकतो. त्यामुळे सध्यातरी कॉग्रेसला गेहलोत यांच्या पाठीशी उभे राहायचे आणि त्यांच्या राजकीय अनुभवाचा फायदा घेण्याचाही प्रयत्न सुरु आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT