उपचारासाठी ऑस्ट्रेलियातून भारतात आली, महिलेचा बाथरूममध्ये सापडला मृतदेह

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Australian Women Dead body :ऑस्ट्रेलियासारखा (Australian Women) देश सोडून एक महिला भारतात उपचारासाठी आली होती.उत्तरप्रदेशच्या (Uttarpradesh) गोरखपुरमधील आरोग्य मंदिरात उपचारासाठी आलेल्या या महिलेचा बाथरूममध्ये (washroom)मृतदेह सापडल्याची धक्कादायक घटना घडलीय.या घटनेनंतर परीसरात एकच खळबळ माजली आहे.पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे.तसेच पोलिसांनी (police) मृतदेह ताब्यात घेत पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. या पोस्टमार्टममधून मृत्यूचे कारण समोर येणार आहे.दरम्यान या प्रकरणात महिलेवर अतिप्रसंग झाला आहे की तिची कोणी हत्या करण्यात आली आहे. या दिशेने पोलीस तपास करतायत.(Woman came to India from Australia for treatment, body found in bathroom)

ADVERTISEMENT

मृत महिलेचा मुलगा आणि सून ऑस्ट्रेलियामध्ये (Australian Women) राहतात. या दोघांसोबतच मृत महिला देखील राहायची.ही महिला एक स्पोर्टसवूमन आहे.तसेच दहा दिवसांपुर्वीच ही महिला ऑस्ट्रेलियावरून नेपालमध्ये आली होती. नेपालमधून तिला गोरखपूरच्या आरोग्य मंदिराची माहिती देण्यात आली होती.मृत महिला हि डिप्रेशनची शिकार झाली होती म्हणून उपचारासाठी गोरखपुरच्या आरोग्य मंदिरात आली होती.या आरोग्य मंदिरात तिच्यावर उपचार सूरू होते. या उपचारा दरम्यानच तिचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय.

नाशिक हादरलं : आईला बेशुद्ध करून 3 महिन्याच्या चिमुकलीचा चिरला गळा

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

सोमवारी पहाटे महिलेने मॉर्निंग वॉक केला, त्यानंतर बाहेरच नाश्ता करून ती घरी परतली होती.तासाभरानंतर ज्यावेळेस तिच्या कुटूंबातील इतर लोक तिच्या रूममध्ये आले, त्यावेळेस तिच्या बाथरूमचा दरवाजा उघडा होता.आणि महिलेचा मृतदेह (Australian Women) शॉवरला लटकलेल्या अवस्थेत सापडला होता. ही घटना पाहून कुटूंबियांच्या पायाखालची जमीन सरकली होती.तसेच त्यांनी एकच आरडाओरड केली होती.कुटूंबियांनी या घटनेची माहिती पोलिसांना देऊन तिला रूग्णालयात दाखल केले होते.यावेळी डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले होते.या घटनेनंतर पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला होता.आता या पोस्टमार्टम रिपोर्टची पोलीस वाट बघतायत.या पोस्टमार्टम रिपोर्टमधून महिलेच्या मृत्यूचे काय कारण समोर येते याकडे पोलिसांचे लक्ष लागले आहे.

घृणास्पद… कुत्र्यावर बलात्कार, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद!

ADVERTISEMENT

महिला डिप्रेशनचा(Australian Women) सामना करत होती.याच आजारावर तिच्यावर उपचार सुरु होते.या उपचारादरम्यान तिने आत्महत्या केली आहे. मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे.हा रिपोर्ट समोर आल्यानंतर पुढची कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती शाहपूरचे इन्स्पेक्टर मनोज पांडे यांनी दिली आहे.

ADVERTISEMENT

दरम्यान जगभरात डिप्रेशनच्या रूग्णांची संख्या वाढत चालली आहे. २५ वयोगटापासून ते ४५ ते ५० वयोगटापर्यंत नागरीकांमध्ये या डिप्रेशनचे प्रमाण अधिक आहे. सध्याच्या तरूणाईत ही संख्या जास्त आहे. त्यामुळे हा वाढता आकडा खुपच चिंताजनक आहे.

अनैतिक संबंधांचा संशय…आईसह 9 महिन्याच्या चिमुकलीला जिवंत जाळलं

    follow whatsapp

    ADVERTISEMENT