Baramati lok sabha : ‘कुणाच्या बापाचं ऐकणार नाही’, अजित पवारांचा बारामतीकरांना इशारा

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

ajit pawar big announcement on baramati lok sabha election 2024 supriya sule sharad pawar maharashtra politics
ajit pawar big announcement on baramati lok sabha election 2024 supriya sule sharad pawar maharashtra politics
social share
google news

Ajit pawar Supriya sule Baramati Lok Sabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या अजित पवारांनी (Ajit Pawar) बहीण सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना पराभूत करण्याचा निर्धार केल्याचे दिसत आहे. ‘माझ्या मताचाच खासदार हवा’, असं म्हणताना अजित पवारांनी थेट बारामतीच्या मतदारांनाच इशारा दिला. सुप्रिया सुळे विरुद्ध उमेदवार देण्याची घोषणा करतानाच अजित पवारांनी शरद पवारांनाही (Sharad Pawar) लक्ष्य केलं आहे. (ajit pawar big announcement on baramati lok sabha election 2024 supriya sule sharad pawar maharashtra politics)

ADVERTISEMENT

रविवारी अजित पवार बारामतीत होते. वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची भाषणे झाली. त्यात ते त्यांनी बारामतीची निवडणूक गांभीर्याने घेतल्याचे दिसले. इतकी वर्ष वरिष्ठाचं ऐकलं आता माझं ऐका म्हणत शरद पवारांना आव्हान देताना दिसले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या कार्यक्रमात ‘मी उमेदवार आहे’, असं अजित पवार म्हणाले. त्यानंतरच्या कार्यक्रमात मात्र ‘माझा खासदार आला नाही तर…’, असं म्हणत त्यांनी थेट इशारा दिला.

अजित पवारांनी काय बोलले?

बारामती व्यापारी महासंघातर्फे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. पवार म्हणाले, ‘राज्यात एनडीएकडून ४८ जागांचे वाटप होईल. मागे जिथे राष्ट्रवादीचे खासदार होते, त्या जागा आपल्याला मिळतील. या स्थितीत मी माझ्या पक्षाचा उमेदवार तिथे देणार आहे.’

हे वाचलं का?

हे ही वाचा :Lok Sabha : 38 विरुद्ध 62… प्रशांत किशोरांनी सांगितला भाजपला हरवण्याच्या फॉर्म्युला

‘लोकसभा व विधानसभा या दोन्ही वेळेला मला तुमची साथ लागेल. आपल्या विचारांचा खासदार झाला तर मोदी, शाहांकडून मी हवी तेवढी विकासाची कामे मंजूर करून आणू शकतो. त्यासाठी माझ्याच विचारांचा खासदार असणे आवश्यक आहे. मला खासदारकीला मिठाचा खडा लागला तर आमदारकीला मी वेगळा विचार करेन, त्यावेळी कुणाच्या बापाचे ऐकणार नाही’, असा इशारा पवार यांनी दिला.

सुप्रिया सुळे यांचं नाव न घेता अजित पवार म्हणाले, ‘लोकसभा निवडणुकीवेळी काहीजण रडून मदत मागतील पण निकाल तुम्ही घ्या.’

ADVERTISEMENT

शरद पवारांबद्दल अजित पवार म्हणाले…

‘आमच्या पक्षात सगळे तिकडे जाण्याची भूमिका घेणार होते. सध्या त्या गटात थांबलेले दहा-अकरा लोक पण जाणार होते. मला आता सगळे उघड करायचे नाही. पण सगळे ठरलेले असताना अचानक भूमिका बदलली गेली’, असे ते शरद पवारांचे नाव न घेता म्हणाले.

ADVERTISEMENT

हे ही वाचा :Uddhav Thackeray : ‘मिंधेंनीच मला गुंड बनवलं’, ठाकरेंची CM शिंदेंवर तोफ; गोळीबारावर काय बोलले?

पुढे ते म्हणाले, ‘माझ्या राजकीय जीवनात मी नेहमीच वरिष्ठांच्या भूमिकेचे समर्थन करत आलो. १९७८ पासून ते राष्ट्रवादीच्या स्थापनेपर्यंत त्यांनी वेगवेगळ्या भूमिका घेतल्या. मी स्वतः दोनदा पंजा चिन्हावर आमदार तर एकदा खासदार झालो.’

‘मध्यंतरीच्या काळात सरकारमध्ये नसताना कामे थांबली होती. कामांची गती कायम राखायची असेल तर सत्ताधारी पक्षात असणे गरजेचे आहे. आम्ही सत्तेत सहभागी असलो तरी आमची भूमिका बदललेली नाही. आजही आम्ही सेक्यूलर भूमिकेवर ठाम आहोत. छत्रपती शिवराय, शाहू-फुले- आंबेडकरांचे विचार घेवून पुढे जाणार आहोत’, अशी भूमिकाही अजित पवारांनी मांडली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT