मुख्यमंत्री तीन दिवस सुट्टीवर? एकनाथ शिंदे म्हणाले, मी तर…

मुंबई तक

ADVERTISEMENT

cm goes on 3 days leave now eknath shide share there reaction
cm goes on 3 days leave now eknath shide share there reaction
social share
google news

CM Eknath shide goes on 3 days leave : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) तीन दिवस रजेवर गेल्याची चर्चा मंगळपासून रंगली होती. मुख्यमंत्र्यांच्या या रजेवरून अनेक तर्कवितर्क लावले जात होते, त्यासोबत विरोधकांनी देखील त्यांना घेरले होते. आता या सु्ट्टीच्या चर्चेवर मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. घरी अडीच वर्षे बसलेल्यांनी दोन-तीन दिवस इकडे गेलो, तिकडे गेलो, हे बोलाव, असाच टोलाच मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरेंना (Uddhav Thackeray) लगावला आहे.(cm goes on 3 days leave now eknath shide share there reaction)

ADVERTISEMENT

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) 24 ते 26 एप्रिल दरम्यान तीन दिवस सुट्टीवर असल्याची चर्चा रंगली होती. या सु्ट्टीत शिंदे त्यांच्या मूळ गावी सातारामध्ये गेले असल्याचे बोलले जात होते. गावी पुजा आणि प्रार्थना करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यात गेल्याची माहिती होती. दरम्यान एकीकडे राज्यात राजकारण पेटले असताना मुख्यमंत्री अचानक सुट्टीवर गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

हे ही वाचा : बारसूसाठी पंतप्रधानांना पत्र अन् ठाकरेंचा दुटप्पीपणा, मुख्यमंत्री काय म्हणाले?

सुट्टीवर नाहीए मी, सध्या डबल ड्यूटीवर आहे. घरी अडीच वर्षे बसलेल्यांनी दोन-तीन दिवस इकडे-तिकडे गेलो हे बोलाव, असा टोला मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंना लगावला. आरोप करणाऱ्यांना काहीच कामधंदा नाही आहे, आता त्यांना घरीच बसवलंय,अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली. घरी बसवलंय म्हणून आरोप करताय. पण आम्ही आरोपांचे उत्तर आरोपाने नव्हे तर कामाने देऊ, असा विश्वास देखील मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांनी यावेळी व्यक्त केला.

हे वाचलं का?

बारसू रिफायनरीवर काय म्हणाले?

बारसू ग्रीन रिफायनरीसाठी (rajapur barsu refinery) तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहले होते. त्यामुळेच या प्रकल्पाला हिरवा कंदील दिला होता. त्यामुळे त्यावेळेस ठाकरेंनी का विरोध केला नाही?त्यावेळी विशिष्ट परीस्थिती होती का? विशिष्ट तडजोडी झाल्या होत्या का? आता मुख्यमंत्री पद गेल्यानंतर विरोध करण्याचे कारण काय? अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती मुख्यमंत्र्यांनी ठाकरेवर केली आहे.दरम्यान समृद्धी महामार्गाला देखील सुरुवातीला विरोध केला होता, मात्र मी खंबीरपणे आणि जिद्दीने हा प्रकल्प पुढे नेला,असे देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले. चांगल्या कामाला विरोध करणे हा दुटप्पीपणा असल्याची टीका देखील त्यांनी ठाकरेंवर केली.

हे ही वाचा : ‘आधी बोंबाबोंब, अन् नंतर…’, उद्योगमंत्री उदय सामंत ठाकरेंवर चिडले

बारसू ही ग्रीन रिफायनरी आहे आणि यामुळे प्रदूषण होणार नाही, अशाप्रकारचे त्यांनी आश्वस्त केले आहे. बारसू या ठिकाणी रिफायनरी व्हावी, तिथल्या भागाचा विकास व्हावा, लोकांना रोजगार मिळावा, हजारो कोटींची गुंतवणूक तिकडे होऊ शकते,असे देखील मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT