Devendra fadnavis : भुजबळांचा असा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी…’, फडणवीसांनी काय सांगितलं?
विरोधी पक्षातील नेत्यांना, स्व: सरकारमधील आणि स्व: पक्षातील नेत्यांना मला सांगायचे, 17 नोव्हेंबरला अंबडला माझी ओबीसीची पहिली रँली झाली. आणि 16 नोव्हेंबरला मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. आणि मंग अंबडच्या सभेला रवाना झालो, असे भुजबळ यांनी सांगितले.
ADVERTISEMENT
Devendra Fadnavis Reaction on Chhagan Bhujbal Resignation : ‘मी 16 नोव्हेंबरला मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता आणि अंबडच्या सभेला रवाना झालो होता’ असा खळबळ उडवून टाकणारा गौप्यस्फोट राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी अहमदनगरमधील ओबीसी मेळाव्यातून केला होता. भुजबळांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा असताना आता विविध प्रतिक्रिया समोर येत आहे. उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आता यावर प्रतिक्रिया दिली आहे. (devendra fadnavis reaction on chhagan bhujbal resignation maratha reservation manoj jarange patil maharashtra politics)
ADVERTISEMENT
देवेंद्र फडणवीस शनिवारी गडचिरोली दौऱ्यावर होते. यावेळी माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीसांनी भुजबळांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली. या संदर्भात मुख्यमंत्री सांगू शकतील, भुजबळ साहेबांचा कुठलाही राजीनामा आम्ही स्विकारलेला नाही. मी किंवा मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा स्विकारला नसल्याचे फडणवीसांनी सांगितले आहे.
हे ही वाचा : Ganpat Gaikwad : भाजप आमदाराने महेश गायकवाडांना कुठे कुठे मारल्या गोळ्या? Photo
सुनील तटकरे काय म्हणाले?
भुजबळ साहेब आमच्या सर्वांचे वरिष्ठ नेते आहेत. मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे ही त्यांची देखील भूमिका आहे, पण ते देत असताना कायद्याच्या कसोटी वरती टिकणार आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता ते दिलं जावं. ही भूमिका सातत्याने त्यांनी मांडलेली आहे, असे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले आहेत.
हे वाचलं का?
तसेच माझं आणि भुजबळ साहेबांचं बोलणं काहीही होऊ शकलं नाही मी जरूर प्रदेशाध्यक्ष या नात्याने भुजबळ साहेबांशी बोलेल. आजच्या सभेच्या अनुषंगाने ते काय बोललेत.त्यांच्या काय भावना आहेत. हे निश्चितपणानं आम्ही सगळेजण जाणून घेऊ आणि मग त्याच्यावर जी काय प्रतिक्रिया असेल ती मी देईन, असे तटकरे म्हणाले आहेत.
भुजबळांच विधान काय?
विरोधी पक्षातील नेत्यांना, स्व: सरकारमधील आणि स्व: पक्षातील नेत्यांना मला सांगायचे, 17 नोव्हेंबरला अंबडला माझी ओबीसीची पहिली रँली झाली. आणि 16 नोव्हेंबरला मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. आणि मंग अंबडच्या सभेला रवाना झालो, असे भुजबळ यांनी सांगितले.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Ganpat Gaikwad: ‘हो झाडल्या मी गोळ्या…’, जाहीर कबुली देणारे आमदार गणपत गायकवाड आहेत तरी कोण?
कुणी म्हणतो राजीनामा दिला, कुणी म्हणतो का देत नाही, कुणी म्हणतो भुजबळांच्या कंबरेत लात घालून त्याला मंत्रिमंडळाच्या बाहेर काढा. पण काही गरज नाही दिलेला आहे मी राजीनामा. लाथ मारण्याची मला गरज नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले की कुठेही वाच्यतो नको, म्हणून मी अडिच महिने शांत राहिलो, गप्प बसलो, असे देखील भुजबळ सांगतात.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT