Mumbai : बंडाची चर्चा! गौतम अदानी थेट शरद पवारांच्या ‘सिल्व्हर ओक’वर, 2 तास खलबतं
उद्योगपती गौतम अदाणी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईतील निवासस्थान सिल्व्हर ओक येथे भेट घेतली. दोघांमध्ये 2 तास चर्चा झाली.
ADVERTISEMENT
विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या बंडाच्या चर्चेची धूळ खाली बसत नाही, तोच महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट आलाय. उद्योगपती गौतम अदाणी सकाळीच थेट शरद पवारांना भेटायला गेले. दोघांमध्ये तब्बल दोन तास बंद खोलीत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. बंडाची चर्चा थंड झालेली नसतानाच ही भेट झाल्यानं राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. नेमकं काय घडलंय आणि त्याचा अर्थ काय हेच समजून घ्या.
ADVERTISEMENT
सुरवातीलाच आपण शरद पवार-गौतम अदानी भेटीचा पार्श्वभूमी बघूया. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राहुल गांधींनी नरेंद्र मोदी आणि गौतम अदानींचा संबंध काय, असा सवाल केला. त्यावरून देशभर एकच गजहब झाला. अदानींकडील २० हजार कोटी कोणाचे असा सवाल विचार विरोधी पक्षांनी संयुक्त संसदीय समितीच्या स्थापनेची मागणी केली. अशातच ६ एप्रिलला अधिवेशन संपलं.
हेही वाचा >> Pawar Vs Raut : ‘वकिली’ लागली जिव्हारी! संजय राऊत अजित पवारांना भिडले
गौतम अदाणी शरद पवारांच्या भेटीची पार्श्वभूमी
दुसऱ्या दिवशी ७ एप्रिलला पवारांनी अदाणी समूहाच्या एनडीटीवीला मुलाखत दिली आणि जेपीसीची मागणी व्यवहार्य नसल्याचा दावा केला. एकप्रकारे पवारांनी विरोधकांच्या मागणीतली हवाच काढून घेतल्याचं म्हटलं गेलं. राहुल गांधी, उद्धव ठाकरे जेपीसीच्या (संयुक्त संसदीय समिती) भूमिकेवर ठाम राहिल्याने पवारांनी एक पाऊल मागे घेतलं.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हेही वाचा >> आप्पासाहेब धर्माधिकारींच्या ‘श्री समर्थ बैठकी’त नेमकी काय मिळते शिकवण?
याच सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि गौतम अदाणींची गुरुवारी (२० एप्रिल २०२३) भेट झाल्याची बातमी समोर आली. उद्योगपती गौतम अदाणी स्वतः शरद पवारांच्या भेटीला सिल्वर ओकवर गेले. दोघांमध्ये तब्बल दोन तास चर्चा झाल्याचीही माहिती सूत्रांनी दिली.
बारामतीतील कार्यक्रमाला अदाणी होते प्रमुख पाहुणे
याआधी गेल्या 16 जून 2022 रोजी शरद पवार- गौतम अदानींची भेट झाली होती. बारामतीत पवारांच्या एका कार्यक्रमाला अदाणी प्रमुख पाहुणे होते. महाराष्ट्रातील सत्तांतराच्या अगदी तोंडावर ही भेट झाली. त्यानंतर आता पुन्हा एकदा अजित पवारांच्या बंडाची चर्चा थंडावत नाही, तोच ही भेट घडून आली आहे. याआधीही दोघांच्या वेळोवेळी गुप्त भेटी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात बोललं जातं.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> Maharashtra Bhushan : 14 श्री सदस्यांच्या मृत्यूचं कारण आलं अखेर समोर
दुसरीकडे शरद पवारांचा ग्रीन सिग्नल नसल्यामुळेच अजित पवारांच्या भाजपसोबत जाण्याची चर्चा फिस्कटल्याचं म्हटलं जातंय. याच पार्श्वभूमीवर ही भेट झाल्यानं वेगळ्या दिशेने वारे वाहायला सुरवात झालीय का, असाही प्रश्न यानिमित्तानं उपस्थित झाला आहे. पण, दोघांमध्ये दोन तास नेमकी चर्चा काय झालीय, हे मात्र समजू शकलं नाही. अदाणी तर सार्वजनिक ठिकाणी राजकीय विषयांवर फारसे बोलत नाहीत पण, शरद पवार या भेटीबद्दल अधिकृत माहिती देणार का? याकडे सगळ्याचं लक्ष आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT