MLA Disqualification Case : ‘सर्व याचिकांवरील सुनावणी एकत्रित घ्या’, ठाकरे गटाचा युक्तिवाद
शिवसेनेच्या अपात्र आमदारांच्या प्रश्नावर आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर जोरदार युक्तिवाद झाला. यावेळी शिंदे आणि ठाकरे गटाने युक्तिवाद केला. त्यावर दोन्ही गटाकडूनही आक्षेप नोंदवण्यात आला.
ADVERTISEMENT
MLA Disqualification Case : राज्यात एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करुन ठाकरे सरकारला पायउतार केल्यापासून राज्याच्या राजकारणाला वेगळे वळण लागले होते. त्यानंतर शिवसेनेच्या आमदारांना (shivsena MLA) अपात्र ठरवण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली. त्या याचिकेची सुनावणी आज दुसऱ्यांदा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर पार पडली. यावेळी दोन्ही गटाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला आहे. या प्रकरणी 34 याचिका सादर करण्यात आल्याने त्या याचिकांचे वेळापत्रकच आजच्या सुनावणीनंतर जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
याचिकांचं वेळापत्रक
शिवसेना आमदार अपात्र प्रकरणावर सुनावणी सुरु झाल्यानंतर दोन्ही गटाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. याप्रकरणी आता एकूण 34 याचिका असून याचिकांचे वेळापत्रक आजच्या सुनवाणीनंतरच जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही सुनावणी होताना ती कधी आणि कशी होणार, वेळापत्रकही कसे असेल असा सवालही विधानसभा अध्यक्षांना विचारण्यात आला. मात्र ठाकरे गटाच्या या युक्तिवादावर शिंदे गटाच्या वकिलांनीही आक्षेप नोंदवला आहे.
शिंदे गटाच्या वकिलांचा आक्षेप
शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर एकूण 34 याचिका आहेत. त्या याचिकांवर ठाकरे गटाने काही सवाल उपस्थित केले होते. त्यांच्या त्या युक्तिवादावर शिंदे गटाच्या वकिलांनी आक्षेप घेतला आहे. त्यानंतर ठाकरे गटाकडूनही युक्तिवाद करण्यात आला आहे.
हे वाचलं का?
महत्त्वाची याचिका निकाली काढा
शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर ठाकरे गटाकडून युक्तिवादाला सुरुवात करण्यात आल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सर्व याचिकांवरील सुनावणी एकत्रित घ्यावी अशी मागणी ठाकरे गटाने केली. सातत्याने आम्ही तुमच्याकडे मागणी करत आहे, मात्र यामध्ये महत्वाचा मुद्दा हा अपात्रतेचा आहे. त्यामुळे तुम्ही ही महत्वाची याचिका निकाली काढण्याची मागणी ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्षांसमोर केली आहे.
याचिकांची सुनावणी एकत्रित नको
ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी युक्तिवाद करताना सांगितले की, सर्व याचिका एकत्र करा या मागणीबरोबर ठाकरे गटाने सांगितले की, आमच्या मागणीवर विचार का केला जात नाही असा सवाल केला आहे. त्यानंतर मात्र शिंदे गटाच्या वकिलांनी त्यावरही आक्षेप नोंदवला. त्यावेळी त्यांनी सर्व याचिकांची सुनावणी एकत्रित नको असा आक्षेपही शिंदे गटाकडून घेण्यात आला.
ADVERTISEMENT
आजच्या सुनावणीतले चार महत्त्वाचे मुद्दे
1. शिंदे गटाला प्रत्येक आमदाराची स्वतंत्र सुनावणी हवी आहे. काही आमदारांकडे त्यांचे काही पुरावे आहेत जे त्यांना सादर करायचे आहेत. यामुळे न्यायिक पद्धतीने त्यांना तशी संधी मिळायला हवी असं शिंदे गटाचं म्हणणं आहे जे त्यांनी अध्यक्षांसमोर मांडलं.
ADVERTISEMENT
2. या प्रकरणाच्या सुनावणीची रुपरेषा, प्रक्रिया आणि वेळापत्रक अध्यक्ष ठरवणार असून याबाबत दोन्ही गटांना अद्याप माहिती दिलेली नाही. याबाबतचा निर्णय राखून ठेवला आहे. ते कधी जाहीर करतील याबाबत स्पष्टता नाही.
3. ठाकरे गटाचं म्हणणं आहे ही केस ओपन अँड शट आहे कारण सर्व पुरावे उघड आहेत. सर्व घटनाक्रम जाहीरपणे झाला आहे. 21 जून 2022 रोजी बैठक बोलावली होती त्याला शिंदे गटातले आमदार आले नाहीत. दहाव्या परिशिष्टाच्या चौकटीतच सुनावणी व्हावी असं ठाकरे गटाचं म्हणणं आहे.
4. स्वतंत्र सुनावणीची मागणी करून वेळ घालवण्याचा, निर्णयाला विलंब करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा ठाकरे गटाचा आरोप आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT