Mla Disqualification : राहुल नार्वेकर शिंदे-ठाकरेंना देणार धक्का, कसा असणार निकाल?

ऋत्विक भालेकर

ADVERTISEMENT

mla disqualification result vidha sabha speaker rahul narwekar declare result eknath shinde vs udhhav thackeray maharashtra politics
mla disqualification result vidha sabha speaker rahul narwekar declare result eknath shinde vs udhhav thackeray maharashtra politics
social share
google news

Mla Disqualification Case : शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल आज जाहीर होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) आज दुपारी 4 वाजता या निकालाचे वाचन करणार आहेत. हा निकाल साधारण 1200 पानांचा असणार आहे. त्यात शिंदे-ठाकरे गटाने दाखल केलल्या 34 याचिकेतील प्रत्येक याचिकेची स्वतंत्र सुनावणी झाल्यास विलंब होणार आहे. त्यामळे या याचिकेची विभागणी सहा गटात करण्यात आली होती. यामुळे याचिकांच्या या सहा गटांचे सहा स्वतंत्र निकाल वाचून दाखवले जातील. अशाप्रकारे हा निकाल देण्यात येणार आहे. या निकालाकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. त्यामुळे हा निकाल ठाकरे (Uddhav Thackeray) की शिंदे (Eknath Shinde) नेमका कुणाच्या बाजून लागतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (mla disqualification result vidha sabha speaker rahul narwekar declare result eknath shinde vs udhhav thackeray maharashtra politics)

ADVERTISEMENT

आमदार अपात्रता प्रकरणात शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांकडून एकूण 34 याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. प्रत्येक याचिकेची स्वतंत्र सुनावणी झाल्यास विलंब होणार आहे. त्यामुळे या 34 याचिकांची सहा गटात विभागणी करण्यात आली आहे. यामुळे याचिकांच्या या सहा गटांचे सहा स्वतंत्र निकाल वाचून दाखवले जातील. परंतु हे सहा निकाल एकमेकांपेक्षा फार वेगळे नसतील, असे विधिमंडळा अध्यक्ष कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.

हे ही वाचा : Suchana Seth : पोटच्या पोराला सूचनानं कसं संपवलं? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून झाला खुलासा

विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात ही सुनावणी पार पडणार आहे. या प्रकरणात हा निकाल साधारण 1200 पानांचा असणार आहे. याचिकेच्या प्रत्येक गटाचा निकाल 200 पानांहून अधिक आहे. त्यामुळे निकालातील ठळक मुद्देच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर वाचून दाखवणार आहेत. या सुनावणीसाठी दोन्ही गटाचे याचिकाकर्ते आणि वकिलांना बोलवलं जाणार आहे.

हे वाचलं का?

निकालातील 4 महत्वाच्या गोष्टी

या निकालातून चार महत्त्वाच्या गोष्टीची स्पष्टता येणार आहे, असा दावा विधिमंडळ कार्यालयातील सुत्रांनी केला आहे.

1. पक्षांतर बंदी कायद्याची स्पष्टता आणि नेमकी व्याख्या या प्रकरणाच्या निकालानंतर स्पष्ट होईल.
2. सर्वोच्च न्यायालयाच्या या प्रकरणातील मर्यादा स्पष्ट होतील.
3. अशा प्रकरणांमधील अध्यक्षांची कार्यकक्षा आणि अधिकार हे स्पष्ट होतील.

ADVERTISEMENT

“लोकांनी जो निकाल गृहीत धरलेला आहे तसाच निकाल लागणार आहे, निकालात समतोल साधलेला असेल असे देखील विधिमंडळ कार्यालयातील सुत्रांनी सांगितले आहे. तसेच हा निकाल अध्यक्ष वाचून दाखवतील परंतु सर्वोच्च न्यायालयाला पाठवण्यात येणार नाही. या निकालाला दोन्हीपैकी एका गटाकडून आव्हान दिल्यास प्रकरण सर्वोच्च न्यायालयात जाईल, असे देखील सांगण्यात आले आहेत.’

ADVERTISEMENT

हे ही वाचा : MNS : ‘राज ठाकरे दलाल, अमित खंडणीखोर’, मनसे नेत्याच्या आरोपानंतर तुफान राडा

दरम्यान आता आमदार अपात्रतेचा निकाल हा आता ठाकरे की शिंदे नेमका कुणाच्या बाजूने लागतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT