Rajya Sabha election 2024 : काँग्रेसला निवडणुकीत बसणार धक्का?

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

rajya sabha election maharashtra, what will happened in 2022.
rajya sabha election maharashtra, what will happened in 2022.
social share
google news

Maharashtra Rajya Sabha 2024 election : राज्यात राज्यसभा निवडणुकीत महायुतीचे (भाजप, शिवसेना आणि राष्ट्रावादीचा अजित पवार गट) पारडे जड दिसत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट झाल्यानंतर बहुतांश आमदार सत्तेत सहभागी झालेत. पण, यावेळी लक्ष आहे ते काँग्रेसकडे. 27 फेब्रुवारी रोजी राज्यसभेसाठी मतदान होणार आहे. 2022 मध्ये झालेल्या निवडणुकीची पुनरावृत्ती होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, काँग्रेसला धक्का बसू शकतो.

ADVERTISEMENT

राज्यात राज्यसभेच्या 6 जागांसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचा शरद पवार गट आणि शिवसेनेकडे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) एक उमेदवार निवडून आणता येईल इतकी मते नाहीत. दुसरीकडे काँग्रेस एक उमेदवार पाठवू शकते. दुसरीकडे भाजपकडे तीन उमेदवार निवडून येतील इतकी मतांची संख्या आहे. तर अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडेही प्रत्येकी एक उमेदवार निवडून येईल इतकी मते आहेत.

चौथा उमेदवार उतरवल्या येणार रंगत?

राज्याच्या राजकारणात सध्या अशीही चर्चा सुरू आहे की, भाजप चौथा उमेदवार निवडणुकीत उतरवू शकते. त्यामुळेच ही निवडणूक रंगतदार होऊ शकते. कारण चौथा उमेदवार उतरवल्यास भाजपला महाविकास आघाडीतील मतांची गरज पडू शकते. आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादीचे (शरद पवार) आमदार फुटण्याची शक्यता कमी आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा >> कोण आहे मौलाना मुफ्ती सलमान अझहरी? ज्याच्यामुळे घाटकोपरमध्ये झाला राडा

त्यामुळे राजकीय वर्तुळात अशीही चर्चा आहे की, काँग्रेसची मते फुटू शकतात. 2022 मध्ये झालेल्या विधान परिषद निवडणुकीत असेच घडले होते.

काँग्रेसची फुटली होती सात मते!

जून 2022 मध्ये राज्यसभा निवडणुकीनंतर विधान परिषद निवडणूक झाली होती. या निवडणुकीत काँग्रेसने दोन उमेदवार दिले होते. दोन्ही उमेदवार निवडून येणे अपेक्षित असताना चंद्रकांत हंडोरे मात्र पराभूत झाले होते. काँग्रेसची सात मते फुटल्याचे नंतर समोर आले होते.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> ‘मुख्यमंत्र्यांना अटक करा!’, फडणवीसांना घेरलं; ठाकरेंचे 4 सवाल

या प्रकरणाची काँग्रेसने चौकशी केली होती. मोहन प्रकाश समितीही नियुक्ती केली होती. अहवाल काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे दिला गेला, मात्र त्या आमदारांवर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळेच यावेळी काँग्रेसची मते फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसे झाल्यास काँग्रेससाठी लोकसभा निवडणुकीआधी मोठा धक्का असेल. असे घडू नये म्हणून काँग्रेस प्रयत्न करत असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT