Ramdas Kadam: “नारायण राणे गेले तेव्हा तुमची #@ पिवळी झाली”, ठाकरेंवर वार
Ramdas Kadam Reaction On Uddhav Thackeray Khed Rally : रामदास कदमांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खेडमध्ये उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली. या सभेत उद्धव ठाकरेंनी रामदास कदम यांच्यावर टीका केली. ठाकरेंच्या या टीकेनंतर रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंवर भ्रष्टाचाराचे आरोप करत वार केला. भूतकाळातील काही गोष्टींचा उल्लेख करत कदमांनी ठाकरेंवर प्रहार केला. (Ramdas Kadam Hits Out […]
ADVERTISEMENT
Ramdas Kadam Reaction On Uddhav Thackeray Khed Rally : रामदास कदमांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खेडमध्ये उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली. या सभेत उद्धव ठाकरेंनी रामदास कदम यांच्यावर टीका केली. ठाकरेंच्या या टीकेनंतर रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंवर भ्रष्टाचाराचे आरोप करत वार केला. भूतकाळातील काही गोष्टींचा उल्लेख करत कदमांनी ठाकरेंवर प्रहार केला. (Ramdas Kadam Hits Out Uddhav Thackeray)
ADVERTISEMENT
उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिलं. “खेडचा सगळा विकास मी केला म्हणूनच खेडची ओळख रामदास कदमचा बालेकिल्ला अशी आहे. उद्धवजींना हे माहिती नसेल, शिवसेनाप्रमुखांना माहिती होतं. काल जो इथं राजकीय शिमगा झाला, त्यात खेडची लोक किती होती. त्यात मुंबई, पुणे, ठाणे, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, रायगड येथून लोक आणली.”
रामदास कदम पुढे म्हणाले, “उद्धव साहेब तुम्ही एकदा नव्हे, शंभर वेळा खेडमध्ये आलात, तरी योगेश कदमांना तुम्ही पाडू शकणार नाही. माझ्या मुलाला संपवण्याचा तुम्ही प्रचंड प्रयत्न केला. मला तर तुम्ही राजकारणातून संपवणारच होता. मला तुम्ही सांगितलं होतं की, कुठल्या मीडियासमोर जायचं नाही. मला बंदी केली होती. अनेक गोष्टी आहेत. मी पुस्तकात लिहिणार आहेत.”
हे वाचलं का?
उद्धव ठाकरेंसह सगळ्यांची अयोध्येतील सगळी व्यवस्था मी केली -रामदास कदम
“अयोध्येला जेव्हा उद्धवजी निघाले होते, तेव्हा तिथे सगळ्या लोकांची सगळी व्यवस्था मी केली होती. संजय राऊत यांचे साक्षीदार आहेत. पण, आदल्या दिवशी उद्धवजी तुम्ही बोलवून घेतलं आणि सांगितलं की, अयोध्येला यायचं नाही. मला कारण कळलं नाही. बाळासाहेब गेल्यानंतर माझी भाषणं तुम्ही बंद करून टाकली. कारण मला कळलं नाही”, असं रामदास कदम म्हणाले.
Thackeray Vs Shinde: उद्धव ठाकरेंचा इशारा, एकनाथ शिंदेंना हसू अनावर, म्हणाले…
ADVERTISEMENT
“जेव्हा उमेदवार माझ्या सभेची मागणी करायचे, तेव्हा शिवसेनाभवनातून सांगितलं जायचं की, दुसरं कोणतंही नाव सांगा. उद्धवजी, तुमचा चेहरा अतिशय भोळा दिसतो. त्या भोळ्या चेहऱ्यामागे अनेक चेहरे लपलेले आहेत. याचा साक्षीदार मी आहे, मी तुमची नस नस ओळखतो”, असा गंभीर आरोप रामदास कदमांनी केला.
केशव भोसलेंचा ड्रायव्हर… कदमांचं ठाकरेंना चॅलेंज; ‘सिद्ध करा नाहीतर माझ्या घरी भांडी घासा’
उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेवर रामदास कदम म्हणाले, “तुम्ही सांगितलं की, केशव भोसलेंचा ड्रायव्हर होता. उद्धवजी, मी केशव भोसलेंचा ड्रायव्हर होतो, हे जर तुम्ही सिद्ध केलं, तर तुमच्या घरी मी भांडी घासेल. नाहीतर उद्धवजी, तुम्ही माझ्या घरी भांडी घासायला या. आपण कुणाचं ऐकतोय, काय बोलतोय. मी वाघासारखा जगलोय. कुणाची नोकरी केली नाही. केशव भोसलेंच्या निवडणुकीला माझी गाडी, माझं डिझेल… काय संबंध कुठल्या ड्रायव्हरचा?”
ADVERTISEMENT
उद्धव ठाकरेंवर भ्रष्टाचाराचे आरोप
“तुमच्या हातात धनुष्यबाण येईल कसा? तुमचे हात बरबटलेले आहेत. भ्रष्टाचारी आहेत. भाडुंपचा आमदार अशोक पाटील याने दापोलीच्या जाहीर सभेत त्याच्या आमदारकीचा सौदा किती कोटीमध्ये झाला, हे सांगितलं होतं. तिकीट देण्यासाठी आणि तिकीट कापण्यासाठी जर पैसे घेत असाल, तर अशा भ्रष्टाचाऱ्याच्या हातामध्ये धनुष्यबाण शोभेल का?”, असं रामदास कदम म्हणाले.
Sanjay Kadam : पक्षप्रवेशाला ठाकरे उपस्थित; दापोलीत कसं बदलणार राजकारण?
“गद्दार, चोर, बेईमान, खोके… खोक्यांमध्ये तुम्ही अडकलात. ज्याला कावीळ असते, त्याला सगळं जग पिवळं दिसतं. आमदाराने पैसे घेतल्याचं एक तरी उदाहरण दाखवा. बाप दाखवा नाहीतर श्राद्ध घाला. तुम्ही शिवसेनाप्रमुखांचे तुम्ही चिरंजीव आहात. पण, एक सांगा की, शिवसेनाप्रमुख जिवंत असते, तर त्यांनी सोनिया गांधी आणि राष्ट्रवादीसोबत जाऊन तुम्हाला मुख्यमंत्री होऊ दिलं असत का?”
नारायण राणे… उद्धव ठाकरे; कदम का भडकले?
“तुम्ही म्हणालात मिंध्यांची जीभ हासडून टाकेन, तुमच्यात हिंमत आहे का? नारायण राणे ज्यावेळी गेले त्यावेळी तुमची #@ पिवळी झाली होती ना! तुमच्या गाडीमध्ये पुढच्या सीटवर मला बसवल्याशिवाय तुम्ही मातोश्रीमधून बाहेर पडत नव्हता आणि मुख्यमंत्र्यांची जीभ हासडायच्या गोष्टी करता”, असं टीकास्त्र रामदास कदमांनी ठाकरेंवर डागलं.
Shiv Sena ची स्थापना निवडणूक आयोगाच्या नाही, माझ्या वडिलांनी केली : ठाकरेंनी ठणकावलं
कृष्णा देसाई हत्या प्रकरण… रामदास कदम काय बोलले?
“शिवसेना मोठी होण्यासाठी अनेक शिवसैनिकांच्या हत्या झाल्या. अनेक शिवसैनिक तुरुंगात सडले. जन्मठेप झाल्या. कृष्णा देसाई हत्या प्रकरणातील शिवसैनिकांचे काय हाल झाले, याचा मी साक्षीदार आहे. त्यांना कुठे माहितीये. बाळासाहेब गेल्यानंतर तुम्ही बेफाम झालात की शिवसेना प्रायव्हेट लि. कंपनीचा मालक मी आहे आणि सगळे माझे नोकर आहे, असे वागलात”, असं म्हणत कदमांनी ठाकरेंवर हल्ला चढवला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT