Shrikant Shinde : राऊतांनी घेरण्याआधीच शिंदेंनी ‘ते’ प्रकरण मिटवलं!

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

sanjay raut share photo goons hemant dabhekar meet shrikant shinde naresh mhaske reply maharashtra politics
sanjay raut share photo goons hemant dabhekar meet shrikant shinde naresh mhaske reply maharashtra politics
social share
google news

Sanjay Raut Vs Naresh Mhaske, Shrikant Shinde Photo : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी श्रीकांत शिंदे यांचा एक फोटो एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करून, ‘राज्यात गुंडशाही कोण पोसतोय?’ असा सवाल करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) घेरण्याचा प्रयत्न केला होता. मात्र शिंदेंनी त्याआधीच संबंधित गुंडाची श्रीकांत शिंदेंसोबत (Shrikant Shinde) भेट घडवणाऱ्या पदाधिकाऱ्याची पक्षातून हकालपट्टी केली आहे. या संबंधित पत्रही त्यांनी शेअर केले आहे. त्यामुळे राऊतांनी (Sanajy Raut) घेरण्याआधी शिंदेंनी व्हायरल फोटोच ते प्रकरण मिटवलं आहे. (sanjay raut share photo goons hemant dabhekar meet shrikant shinde naresh mhaske reply maharashtra politics)

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Ganpat Gaikwad : आरोपींचं जेवण, फरशीवर झोपले; भाजप आमदाराची कोठडीत अशी गेली रात्र

राऊतांचा आरोप काय?

खासदार श्रीकांत शिंदे यांचा नुकताच वाढदिवस संपन्न झाला. या वाढदिवसाचा एक फोटो खासदार संजय राऊत यांनी एक्सवर शेअर केला होता. या फोटोत एक व्यक्ती श्रीकांत शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसतेय. त्या व्यक्तीच्या फोटोला सर्कल करून राऊत म्हणाले की, पोलिस स्टेशनमध्ये सत्ताधारी पक्षाचे आमदार गोळीबार करतात. सरकारच्या बाळराजांचे अभिष्टचिंतन करणारी ही वर्तुळातील व्यक्ती कोण याचा शोध घ्या? मग राज्यातील गुंडशाही कोण पोसतो आहे ते कळेल? असे थेट चँलेंज देत मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांना घेरण्याचा प्रयत्न केला. संजय राऊतांनी शेअर केलेल्या फोटोत, पुण्यातील कुख्यात गुंड हेमंत दाभेकर याने खासदार श्रीकांत शिंदेंची भेट घेतल्याचे दिसत आहे. याच गुंडाच्या फोटोवरून राऊतांनी शिंदेंना कोंडील पकडण्याचा प्रयत्न केला.

हे वाचलं का?

हे ही वाचा : Ganpat Gaikwad : ‘पत्नीचं संरक्षण करू शकत नाही ते…’, अंधारेंची फडणवीसांवर बोचरी टीका

नरेश म्हस्केंचे राऊतांना उत्तर

राऊतांच्या या आरोपानंतर शिंदेंचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी यावर उत्तर दिले आहे. वाढदिवसाला जो या गुंडाला घेऊन आला होता, त्या अनिकेत जावळकची आम्ही कालच हकालपट्टी केली आहे. या संबंधित निलंबित पत्र देखील म्हस्के यांनी शेअर केले आहे. तसेच असेच लक्षात आणून देत चला, कारण आमच्यापेक्षा अशा लोकांना तुम्ही जास्त आणि जवळून ओळखता…पण आरशातही बघत चला, आपण कोण आहात आणि कोणत्या गुन्ह्यात आपल्याला अटक झाली होती आणि जामीनावरच आपण बाहेर आहोत हेही लक्षात असू द्या, असा टोला देखील म्हस्केंनी राऊतांना लगावला. तसेच उद्धव ठाकरेंनी देखील तुमच्यापासून दुर राहिले पाहिजे,असा सल्ला देखील त्यांनी दिला.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT