महाराष्ट्रात 5 हजार पाकिस्तानी नागरीक, 1 हजार लोकांना तात्काळ देश सोडण्याचे आदेश, तर उर्वरीत....

मुंबई तक

महाराष्ट्रात 4000 लोक लॉन्ग टर्म व्हिसावर राहत आहेत. त्यापैकी सुमारे 1000 लोक सार्क व्हिसावर आहेत. हे लोक चित्रपटाच्या कामासाठी, वैद्यकीय उपचारांसाठी, पत्रकारितेसाठी किंवा वैयक्तिक कारणांसाठी आले आहेत.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

महाराष्ट्रात 1000 पाकिस्तानी लोक शॉर्ट टर्म व्हिसावर

point

पाकिस्तानी नागरिकांना केंद्र सरकारकडून देश सोडण्याचे आदेश

point

उर्वरीत चार हजार लोकांना कधीपर्यंतची मुदत?

गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी माहिती दिली की, राज्यात सुमारे 5000 पाकिस्तानी नागरिक राहत आहेत. यापैकी सुमारे 1000 लोक  शॉर्ट टर्म व्हिसावर आलेले आहेत. या नागरिकांना केंद्र सरकारकडून देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मंत्री कदम म्हणाले की, काही पाकिस्तानी नागरिक गेल्या 8 ते 10 वर्षांपासून भारतात राहत आहेत. त्यापैकी काहींचं लग्न भारतात झालं आहे. काहींनी त्यांचे पाकिस्तानी पासपोर्ट सोडून भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज केला आहे.

हे ही वाचा >> प्रेमविवाहाचा राग, निवृत्त PSI बापाने हळदीच्या कार्यक्रमात लेकीला गोळी घालून संपवलं, तर जावईही...

4 हजार लोक लॉन्ग टर्म व्हिसावर...

महाराष्ट्रात 4000 लोक लॉन्ग टर्म व्हिसावर राहत आहेत. त्यापैकी सुमारे 1000 लोक सार्क व्हिसावर आहेत. हे लोक चित्रपटाच्या कामासाठी, वैद्यकीय उपचारांसाठी, पत्रकारितेसाठी किंवा वैयक्तिक कारणांसाठी आले आहेत.

वैद्यकीय व्हिसा धारकांसाठी अतिरिक्त वेळ

योगेश कदम म्हणाले की, ज्यांच्याकडे अल्पकालीन व्हिसा आहे त्यांना 27 एप्रिलपर्यंत भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर वैद्यकीय व्हिसा असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना दोन दिवसांचा अतिरिक्त वेळ देण्यात आला आहे. ते 29 एप्रिलपर्यंत राहू शकतात.

22 एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर ही कारवाई करण्यात येत आहे. ज्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर, भारत सरकारने सर्व पाकिस्तानी नागरिकांचे विद्यमान व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

हे ही वाचा >> मुंबईतील ईडी कार्यालयाला मोठी आग, 'त्या' फाईल जळाल्या की वाचल्या?

परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केलंय, की सर्व पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा 27 एप्रिलपासून अवैध होतील. वैद्यकीय व्हिसा असलेले लोक 29 एप्रिलपर्यंत भारतात राहू शकतात.

सीमेवर तणाव

भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे, जम्मू आणि काश्मीरमधील आंतरराष्ट्रीय सीमा (IB) आणि नियंत्रण रेषेजवळील गावांमधील लोकही अलर्ट झाले आहेत. गावांमध्ये, लोक बंकर साफ करत आहेत, गव्हाचे पीक लवकर काढून घेतायत. जेणेकरून उद्या आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षित राहू शकतील.

हे वाचलं का?

    follow whatsapp