"चलो काश्मीर..." अभिनेता अतुल कुलकर्णीचा काश्मीर दौरा, अर्थ काय?
पहलगाम आणि काश्मीरच्या निसर्गरम्य परिसरात चित्रीकरण किंवा सुट्टीसाठी जाण्याचा विचार अनेकांनी गेल्या काही काळात टाळला आहे. मात्र, कुलकर्णी यांनी घेतलेल्या या पावलाने त्यांच्या निर्भय वृत्ती दाखवल्याचं म्हटलं जातंय.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

अभिनेता अतुल कुलकर्णी काश्मीरला

पहलगाममधील हल्ल्यानंतरही दौरा

काश्मीरबद्दल सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करण्याचा प्रयत्न?

Atul Kulkarni Kashmir Visit : जम्मू-काश्मीरमधील सध्याच्या संवेदनशील परिस्थितीनंतरही अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी धाडस दाखवत काश्मीरला जाण्याचा निर्णय घेतला आहे. काश्मीर सुरक्षित आहे आणि तिथल्या सौंदर्याचा आनंद घेता येऊ शकतो, हा संदेश त्यांना या भेटीमधून द्यायचा आहे. कुलकर्णी यांनी मुंबई ते काश्मीरचे विमान तिकीट सोशल मीडियावर शेअर करत आपल्या या निर्णयाची माहिती चाहत्यांना दिली.
हे ही वाचा >> 'चौकीदार जबाबदार, सिंधूचं पाणी तर...' स्वामी अविमुक्तेश्वरानंदांचा थेट PM मोदींवर हल्ला
पहलगाम आणि काश्मीरच्या निसर्गरम्य परिसरात चित्रीकरण किंवा सुट्टीसाठी जाण्याचा विचार अनेकांनी गेल्या काही काळात टाळला आहे. मात्र, कुलकर्णी यांनी घेतलेल्या या पावलाने त्यांच्या निर्भय वृत्तीचं दर्शन घडले आहे.
अतुल कुलकर्णी यांनी सकाळी X वर एक पोस्ट शेअर केली. यामध्ये त्यांनी मुंबई ते श्रीनगर, काश्मीर असा प्रवास करत असल्याचं सांगितलंय. या पोस्टमध्ये त्यांनी #ChaloKashmir, #Feet_in_Kashmir, #Kashmiriyat, #love_compassion असे हॅशटॅग वापरले आहेत. काश्मीरच्या सौंदर्याबद्दल आणि तिथल्या संस्कृतीबद्दल सकारात्मक भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत. तसंच, त्यांनी या पोस्टसोबत विमान तिकीटाचा फोटोही शेअर केला आहे.
हे ही वाचा >> पहलगाम हल्ल्याचा दुसरा Video आला समोर, पाहा नराधमांनी कसा केला पयर्टकांवर हल्ला!
कुलकर्णी यांच्या या निर्णयाचे काहींनी स्वागत केलं आहे, तर काहींनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून चिंता व्यक्त केली आहे. काश्मीरमधील स्थानिक पर्यटन व्यावसायिकांनीही त्यांच्या या पावलाचं कौतुक केलं आहे. “अशा सेलिब्रिटींच्या भेटीमुळे पर्यटनाला चालना मिळेल आणि काश्मीर सुरक्षित असल्याचा संदेश जगभरात जाईल,” असं श्रीनगरमधील एका पर्यटन व्यावसायिकाने लिहिलं आहे.
अतुल कुलकर्णी यांच्या या काश्मीर दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांच्या या भेटीमुळे काश्मीरच्या पर्यटनाला नवसंजीवनी मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.