Abhishek Ghosalkar: विनोद घोसाळकरांनी केली कळकळीची विनंती, 'माझ्या मुलाची विश्वासघाताने हत्या...'
माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. फेसबूक लाईव्ह चालू असताना त्यांची हत्या झाल्याने अनेकांना त्याचा धक्काही बसला. त्यानंतर आरोप-प्रत्यारोपाच्या राजकारणामुळे घोसाळकर कुटुंबीयांची बदनामी होत असल्याने अभिषेक घोसाळकरांचे वडील विनोद घोसाळकरांनी आता बदनामी करू नका अशी कळकळीची विनंती करत निवेदन काढलं आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
'हा बदनामीचा हिडीस प्रकार थांबवा'
'आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला'
'माझ्या मुलाची विश्वासघाताने हत्या...'
Abhishek Ghosalkar Mureder: ठाकरे गटाचे माजी नगरेसवक अभिषेक घोसाळकर यांची फेसबूक लाईव्ह चालू असताना मॉरिस नरोन्हानं (Maurice Naronha) त्यांची गोळ्या घालून हत्या केली. त्यांच्या हत्येमुळे राजकीय वर्तुळासह सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली. त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोप केले गेले. त्यामुळेच मृत अभिषेक घोसाळकर यांचे वडील विनोद घोसाळकर (Vinod Ghosalkar) यांनी निवेदन काढून आपल्या कुटुंबाबद्दल होत असलेली बदनामी कृपा करून थांबवा अशी त्यांनी कळकळीची मागणी त्यांनी केली आहे.
ADVERTISEMENT
बदनामी थांबवा
अभिषेक घोसाळकर यांची हत्या झाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. त्यातच घोसाळकर यांची हत्या होण्याआधी कल्याणमध्येही भाजपचे आमदाराने गोळीबार केल्यामुळे सरकारवर विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला. त्यातच उद्धव ठाकरे यांनीही अनेक सवाल उपस्थित केल्यामुळे या वादाला आणखी तोंड फुटले. त्या प्रकारामुळेच विनोद घोसाळकर यांनी निवेदन काढून आमची होणारी बदनामी थांबवा अशी त्यांनी विनंती केली आहे.
निष्ठेचं राजकारण
माजी आमदार विनोद घोसाळकर यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, '1982 पासून मी सक्रिय राजकारणात आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण या सूत्रानुसार मी माझं काम चालू ठेवलं. त्याच प्रमाणे माझा मुलगा अभिषेक यांनीही निरपेक्षपणे आणि निष्ठेने राजकारण आणि समाजकारण केले आहे. त्यामुळे अजूनपर्यंत आमच्यावर कोणताही डाग नाही.'त्यामुळे ज्या प्रकारे आमची बदनामी केली जात आहे ती थांबवण्याची विनंतीही त्यांनी केली आहे.
हे वाचलं का?
मानसिक धक्का
आपल्या मुलाच्या हत्येनंतर आम्हाला मोठा मानसिक धक्का बसला असल्याचे सांगून त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाची आठवणही करून दिली आहे. यावेळी ते म्हणाले की, 'मी नगरसेवक आणि आमदार म्हणूनही निवडून आलो आहे. त्यानंतर अभिषेक आणि सूनेनेही लोकप्रतिनिधी म्हणूनही काम केले आहे. ते लोकांच्या प्रेमामुळे आम्ही हे करू शकलो असंही त्यांनी सांगितले.
हे ही वाचा >> पवारांनी योगी आदित्यनाथांना इतिहासच सांगितला, 'शिवाजी महाराजांचं कष्ट,कर्तृत्व अन् जिजाऊंचं...'
बिनबुडाचे आरोप
यावेळी माझ्या मुलाची विश्वासघाताने हत्या केली असून आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तरीही या दुःखाच्या काळात अश्लाघ्य भाषेत आणि बिनबुडाचे आरोप केले जात आहे. कारण आमचं राजकीय जीवन उद्ध्वस्त करण्याचंच षडयंत्रही रचले जात असल्याचंही त्यांनी अगदी भावनिक होऊन म्हटले आहे. त्यामुळे कृपा करून ही बदनामी कृपा करून थांबवा अशी माझी कळकळीची विनंतीही त्यांनी केली आहे.
ADVERTISEMENT
खुशाल तक्रार नोंदवा
यावेळी त्यांनी घोसाळकर कुटुंबीयांवर आरोप करणाऱ्यांना त्यांनी हे ही सांगितले आहे की, 'आम्ही काही गुन्हा केला असेल आणि त्याचे पुरावे असतील तर खुशाल तक्रार नोंदवा. पण खोटेनाटे आरोप सहन केले जाणार नाही'असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> 'राऊत अजून तुमची निर्दोष मुक्तता नाही' शंभूराजांची तंबी
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT