Ajit Pawar : शरद पवार अजित पवार एकत्र येणार का? 'दादां'चं मोठं विधान

मुंबई तक

ADVERTISEMENT

ajit pawar exclusive interview ani he will be again join sharad pawar party ncp maharashtra politics ncp politics
अजित पवार एएनआयच्या मुलाखतीत बोलत होते.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अजित पवार यांची एएनआयने मुलाखत घेतली आहे.

point

मुलाखतीत अजित पवारांचे मोठे गौप्यस्फोट

point

शरद पवारांसोबत पुन्हा जाणार का?

Ajit Pawar On Sharad Pawar : शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी माध्यमांनी अजित पवारांना पुन्हा पक्षात घेणार का? असा सवाल केला होता. या प्रश्नावर शरद पवारांनी टोकाची भूमिका न घेता पक्ष यावर भूमिका घेईल अशी प्रतिक्रिया दिली होती. पवारांच्या या प्रतिक्रियेतून अजित पवारांसाठी अजूनही पक्षाची दार खूली असल्याचा कयास बांधला गेला होता. मात्र आता यावर अजित पवारांनी (Ajit Pawar) आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. (ajit pawar exclusive interview ani he will be again join sharad pawar party ncp maharashtra politics ncp politics) 

ADVERTISEMENT

अजित पवार एएनआयच्या मुलाखतीत बोलत होते. यावेळी अजित पवारांना तुम्ही शरद पवारांसोबत जाणार का? असा सवाल करण्यात आला होता. यावर अजित पवार म्हणाले ''नो कमेंटस. पुढे ते म्हणाले,  मी आता महायुतीचा प्रचार करतो आहे. मी बजेटमध्ये चांगल्या चांगल्या योजना आणल्या आहेत. या योजनांचा आती मी महाराष्ट्रभर प्रचार करतो आहे, असे अजित पवार यांनी सांगितले आहे. तसेच सरकारमध्ये आल्यानंतर आम्ही जो विकास केला आहे, त्याबद्दल आम्ही जनतेला माहिती देत आहोत. तसेच लोकसभेच्या निवडणुकीत ज्या गोष्टी आमच्याकडे राहुल गेल्या,त्याच कारणामुळे आमचा मतदार आमच्याकडे आला नाही'', असे अजित पवार यांनी सांगितले आहे. 

हे ही वाचा : Govt Job: नवी मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी! इच्छुकांनी लगेच भरा अर्ज

अजित पवार यांनी या मुलाखतील लोकसभा निवडणुकीतील पराभवाचे कारणे देखील सांगितली आहे. ''अब की बार ४००'' पारचा नारा देऊन सत्ताधाऱ्यांना संविधान बदलायचंय, आरक्षण बदलायचंय असे नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला. याचा संपूर्ण परिणाम महाराष्ट्रावर दिसून आला, असे अजित पवार यांनी सांगितले. आम्ही विरोधकांचे नरेटिव्ह मोडण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही अपयशी ठरलो,'' असे अजित पवार यांनी सांगितले. 

हे वाचलं का?

''लोकांना वाटले की हे 400 पार, 400 पार, निकाल आल्यानंतर 275 पर्यंत बहुमत हवं असतं, पण 273 बोला किंवा 272 बोला, पण हे 300 पण नाही 400 बोलतायत, त्यात एनडीएला 300 च्या वर तर मिळालेच आहेत. मग आता 400 पार होतील तर हे खरं झालं तर आणि विरोधकांनी जनतेमध्ये जो संशय निर्माण केला. आम्ही विरोधकांचा हा नरेटिव्ह बदलण्याचा प्रयत्न केला पण मतदारांनी आमच्यावर विश्वास दाखवला नाही'', असे अजित पवार यांनी सांगितले. 

हे ही वाचा : Mhada Lottery 2024 : म्हाडाचा अर्ज भरताना 'या' चुका टाळा, नाहीतर...

दरम्यान यावेळी अजित पवार यांनी मला अल्पसंख्याक मतं येत नसल्याचा मोठा खुलासा देखील केला. या मागची कारणे देखील अजित पवारांनी सांगितली. ''सीएए हा नवीन कायदा जो आणला होता, तो भारताबाहेर असलेल्या पुन्हा भारतात आणण्याचा होता. कारण रशिया युक्रेन युद्ध सुरु होतं, इस्त्रायल वाद सुरु होता. त्यामुळे या देशात 20 ते 25 वर्षांपासून असणाऱ्यांना भारतात आणण्यासाठी हा कायदा आणला होता. पण अल्पसंख्यांकांमध्ये हा कायदा  हिंदुराष्ट्र बनवण्यासाठी भारताबाहेर असलेल्यांना भारतात घेऊन आणि त्यांना बाहेर काढले जाईल असा संभ्रम होता'', असे अजित पवार यांनी सांगितले. 

ADVERTISEMENT

विधानसभेत फेक नरेटिव्हशी कसा लढा देणार? 

''संपूर्ण देशात असा निकाल लागला नाही. बिहार, मध्यप्रदेशमध्ये तसं झालं नाही. त्यामुळे अशी अनेक राज्य आहेत, तिथे या नरेटिव्हचा असरच झाला नाही. त्या त्या राज्यात लीडरशीप मजबूत असल्या कारणाने त्याचा परिणाम होऊ शकला नाही. आणि त्यांनी जनतेला व्यवस्थितपणे आपली बाजू समजावून सांगितली. त्या तुलनेत महाराष्ट्रात आम्ही कमी पडलो'',असे अजित पवार यांनी कबुली दिली. 
 

ADVERTISEMENT

 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT