Ajit Pawar to meet Sharad Pawar : अजितदादा, प्रफुल्ल पटेल, भुजबळ शरद पवारांच्या भेटीला, वाढदिवस फक्त निमित्त? खरं कारण काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अजित पवार शरद पवार यांच्या भेटीला

point

दिल्लीतील शरद पवार यांच्या निवासस्थानी भेट

point

अजित पवार यांच्यासोबत कोण कोण?

Ajit Pawar to Meet Sharad Pawar in Delhi : ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांचा आज वाढदिवस. राजकारण, समाजकारण, उद्योग, साहित्य, कला, क्रीडा यांसारख्या सर्वच क्षेत्रात आपल्या कामामुळे आणि लोकांसोबतच्या मैत्रीपूर्ण संबंधांमध्ये शरद पवार हे नेहमीच राजकारणाच्या पलीकडे जाऊन काम करणारे नेते म्हणून पाहिले गेले आहेत.  मात्र, याच शरद पवार यांना काही महिन्यांपूर्वी कुटुंबातूनच मोठा धक्का बसला होता.  आज वाढदिवसानिमित्त पवारांना वेगवेळ्या क्षेत्रातील मंडळी त्यांना शुभेच्छा देताना दिसत आहेत. अशातच शरद पवार यांची साथ सोडून भाजपसोबत जाऊन सत्तेत बसलेल्या अजित पवार आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली.

ADVERTISEMENT


हे ही वाचा >> CM फडणवीसांची दिल्लीत जाऊन खलबतं, शिंदे-अजितदादांच्या 'त्या' खात्यांवरही भाजपचा डोळा!
 

अजित पवार यांनी वेगळा निर्णय घेतल्यानंतर पवार कुटुंबात मोठी फूट पडल्याचं बोललं जात होतं. अगदी लोकसभा निवडणुकीत आणि विधानसभा निवडणुकीतही कुटुंबातले बहुतांश सदस्य शरद पवार यांच्यासोबत दिसले होते. आई, पत्नी, मुलं आणि बहीण वगळा पवारांच्या कुटुंबातले ज्येष्ठ लोकं या निवडणुकीत अजित पवार यांच्या विरोधात पाहायला मिळाले होते. पवारांची साथ सोडल्यानंतर घेतलेल्या सभेत अजित पवार, भुजबळ, प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली होती. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या पक्षाला चांगलं यश मिळालं, तर फक्त 10 आमदार निवडून आल्यानं शरद पवार यांना धक्का बसला. मात्र, त्यानंतर या सर्व घडामोडी घडून गेल्यानंतर अजित पवार आज शरद पवार यांची भेट घेत आहेत. निमित्त जरी वाढदिवसाचं असेल, तरी यामध्ये चर्चा काय होणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. 

राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर अगदी काही दिवसांमध्येच हेच सर्व नेते शरद पवार यांना विनवण्या घालण्यासाठी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरला भेटायला गेल्याचं पाहायला मिळालं होतं. मात्र, त्यावेळी शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट करत अजित पवार यांच्यासोबत सत्तेत जाण्यास विरोध केल्याचं समोर आलं होतं.

हे वाचलं का?

दरम्यान, आज अजित पवार, पार्थ पवार, सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ या सर्व नेत्यांनी आज दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी भेटीसाठे गेले आहेत. शरद पवार यांचा जन्म 12 डिसेंबर 1940 रोजी झाला असून, यंदा ते 85 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यामुळे आज त्यांना कोण कोण शुभेच्छा देणार आणि विशेषत: विरोधक त्यांना काय शुभेच्छा देतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT