Buldhana: मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘समृद्धी महामार्गावर ड्रायव्हरच्या चुकांमुळे…’
बुलढाणा बस दुर्घटनेची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकारांना प्रतिक्रिया दिली आहे. समृद्दी महामार्गावर जितकेही अपघात झाले आहेत, हे अपघात ड्रायव्हरच्या चुकांमुळे, झपकी लागून झाल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले आहे.
ADVERTISEMENT
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडा राजा शहराजवळील समुद्धी महामार्गावर आज पहाटे भीषण बस अपघाताची घटना घडली आहे. या बस अपघातात 25 जणांचा दुर्घटनेत होरपळून मृत्यू झाला.तर सुदैवाने या अपघातातून 8 जण बचावले असून ते जखमी आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.या भीषण अपघातावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बुलढाण्यात घडलेली खूप मोठी दुर्घटना असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे. याचसोबत समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी सरकारला ज्या उपाययोजना करता येतील, त्या सरकार करेल, असे देखील मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत.(buldhana sindkhed raja samrudhhi highway bus accident 28 passenger died cm ekanth shinde first reaction)
ADVERTISEMENT
बुलढाणा बस दुर्घटनेचे गाभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळी पोहोचले होते. यावेळी घटनेची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकारांना प्रतिक्रिया दिली आहे. समृद्दी महामार्गावर जितकेही अपघात झाले आहेत, हे अपघात ड्रायव्हरच्या चुकांमुळे झपकी लागून झाल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले आहे. तसेच असे अपघात होऊन चालणार नाही.सरकारला प्रत्येकाच्या जीवाची काळजी आहे. त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण सरकारने गांभीर्याने घेतले असून, ज्या ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहेत, त्या सरकार करेल, असेही मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले आहे.
हे ही वाचा : Buldhana: समृद्धी महामार्गावर 26 प्रवाशी जागीच ठार, अपघातानंतर बस जळून खाक
या दुर्घटनेत 25 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 8 जण जखमी झाले आहेत. या जखमींवर तत्काळ चांगले उपचार करण्याचे आदेश दिले आहेत. पण 25 लोकांना वाचवता आले नाही त्यामुळे दुदैवी घटना असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले आहे. तसेच प्रत्यक्षदर्शी जसे सांगतात,क्युआरव्ही (क्विक रिस्पॉन्स वेहीकल) घटनास्थळी ताबडतोब पोहोचली. पोलिसांपासून फायरबिग्रेड या यंत्रणा घटनास्थळी पोहोचल्या होत्या. पण बसचे दरवाजे बंद असल्याने त्यांना बाहेर काढता आले नाही. नाहीतर आणखीण नागरीक वाचले असते, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत.
हे वाचलं का?
प्रत्येकाने नियमांचे पालन केले पाहिजे. ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे गाड्या चालवल्या पाहिजेत. पण काही बाबतीत ते घडताना दिसत नाही. त्यामुळे लेन कटींग आणि ओव्हरस्पीडसाठी ज्या ज्या उपाययोजना कराव्या लागतील.त्या करण्यात येतील.तसेच भविष्यात अपघात रोखण्यासाठी सरकार कटीबद्ध असेल असे देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ समृद्धी महामार्गावर खाजगी बसच्या झालेल्या भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या अपघातातील मृत आणि त्यांच्या कुटुंबिंयांप्रति सहवेदना प्रकट करुन या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री…
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 1, 2023
ADVERTISEMENT
दरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांनी या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. याचसोबत बुलढाणा बस दुर्घटनेच्या चौकशीचे आदेशही दिले आहेत.मुख्यमंत्री शिंदे यांनी ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Buldhana Accident: लाडक्या लेकाला नागपूरला सोडलं अन्.., नवरा-बायको अन् मुलीचा दुर्दैवी मृत्यू
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT