'क्षणाचाही विलंब न लावता ठाकरेंना 50 कोटी देऊन टाकले', शिंदेंनी तोफ डागली

मुंबई तक

ADVERTISEMENT

CM Eknath Shinde Uddhav Thackeray
CM Eknath Shinde Uddhav Thackeray
social share
google news

बातम्या हायलाइट

point

'तुम्हाला खोके नव्हे,कंटेनर लागतात'

point

ठाकरेंना 50 कोटी देऊन टाकले

Shiv sena: पक्षप्रमुख म्हणून आज तुमच्याकडे ना शिवसेना आहे, ना बाळासाहेबांचे (Balasaheb Thackeray) विचार आहेत. तुम्हाला बाळासाहेब नको, त्यांचे विचार नको तुम्हाला फक्त पैसा महत्वाचा असल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप केले. तुम्ही आमच्यावर 50 खोक्यांचे आरोप करता मात्र तुम्हाला खोके लागत नाहीत, तर तुम्हाला कंटेनर लागतात असा घणाघातही एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला.

ADVERTISEMENT

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलताना त्यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. गावागावातील कार्यकर्त्यांनी रक्ताचं पाणी करून ही शिवसेना मोठी केली आहे. शिवसैनिकांनी घरादारावर तुळशीपत्र ठेऊन शिवसैनिकांनी शिवसेना मोठी केली आहे. 

शिवसैनिकांनीच जेल भोगले, स्वतःच्या अंगावर केस घेतल्या तेव्हा तुम्ही कुठे होता असा सवालही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. 

हे वाचलं का?

'उद्धव ठाकरे तुमच्यावर एक तरी केस दाखवा आणि कितीचं बक्षीस मिळवा असा खोचक सवाल करून त्यांनी 50 खोक्यांचं बक्षीस मिळवा असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

हे ही वाचा >>Upendra Rawat : भाजप खासदाराची निवडणुकीतून माघार, अश्लील व्हिडिओ ठरलं कारण

मुख्यमंत्र्यांनी यावेळी पैशावरून टीका करताना म्हणाले की, 'तुम्हाला खोके पुरत नाहीत, तर तुम्हाला कंटेनर लागतात असं मी म्हणत नाही तर कोणीतरी म्हटले असल्याचे त्यांनी सांगितले. 

ADVERTISEMENT


एकनाथ शिंदे यांनी टीका करताना म्हणाले की, 'बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ज्यांच्याकडे, ज्यांच्याकडे धनुष्यबाण आहे. त्या शिवसेनेकडून तुम्ही 50 कोटींची मागणी करणारं पत्र देता, त्या मागणीमुळेच मी क्षणाचाही विलंब न करता तु्म्हाला पैसे दिले असल्याचेही शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितले. 

ADVERTISEMENT

तुमच्या या पत्रामुळे आता समजलं आहे की, तुम्हाला बाळासाहेब नको, बाळासाहेबांचे विचार नको तुम्हाला फक्त पैसा पाहिजे असा गंभीर आरोपही त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनावर केला आहे.  

आम्हाला तुमची संपत्ती नको हे मी कधीच कबूल केले आहे. बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे. तेच आमचं ऐश्वर्य आहे. म्हणून आपण बाळासाहेबांचे विचार सोडून आपण तुम्ही सत्तेसाठी आणि पैशासाठी तुम्ही काय मिळवलं.

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब म्हणायलासुद्धा तुमची जीभ कचरते असा गंभीर आरोपही त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर त्यांनी केला आहे.

हे ही वाचा >> शिंदेंच्या आमदाराचा बचत गटांसाठी दंडाचा फतवा, रोहिणी खडसेंचा गंभीर आरोप

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT