महाराष्ट्रात NDA ला भारी पडणार INDIA?, शिवसेना-राष्ट्रवादी फुटीचा फायदा की तोटा?

मुंबई तक

ADVERTISEMENT

political
mahavikas aghadi sharad pawar
social share
google news

बातम्या हायलाइट

point

महाराष्ट्रात BJP आणि INDIA मध्ये काटे की टक्कर

point

महाराष्ट्रात भाजपला लोकसभा जड जाणार, कारण...

point

शिवसेना-राष्ट्रवादी फुटीचा भाजपला फायदा की तोटा?

Lok Sabha Election 2024: देशासह महाराष्ट्रात होणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना (Shiv sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) या दोन्ही पक्षात पडलेल्या फुटीचा फायदा भाजपला होईलच असं म्हणता येणार नाही. इंडिया टुडे आणि सी-व्होटरच्या मूड ऑफ द नेशन (mood of the nation) सर्व्हेनुसारही अशीच आकडेवारी आता समोर आली आहे.  शिवसेनेचा ठाकरे गट आणि राष्ट्रवादीचा शरद पवार गट आणि काँग्रेस म्हणजेच महाविकास आघाडी भाजपच्या (BJP) एनडीएला (NDA) जड जाण्याची शक्यता आहे.

ADVERTISEMENT

राज्याचा कल

इंडिया टुडेने 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी केलेल्या सर्व्हेक्षणामध्ये मूड ऑफ नेशन जाणून घेण्याचा प्रयत्न केला. हे सर्वेक्षण 15 डिसेंबर 2023 ते 28 जानेवारी 2024 च्या कार्यकाळात करण्यात आले आहे. हे सर्व्हेक्षणामध्ये भारतातील 543 लोकसभेच्या जागांचा समावेश करण्यात आला आहे. तर त्यामध्येच महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागांचाही समावेश करण्यात आला आहे.

हे ही वाचा >> MOTN: महाराष्ट्रात 'एवढ्या' जागा जिंकू, राऊतांचा दावा

काटे की टक्कर

इंडिया टुडेने केलेल्या सर्व्हेक्षणानुसार राज्यातील लोकसभेच्या 48 जागांवर काँग्रेसबरोबर आघाडी केलेली आघाडी ही भाजपसाठी काटे की टक्कर ठरू शकते. महाराष्ट्रात काँग्रेसबरोबर असलेल्या महाविकास आघाडीला 26 जागा मिळतील, तर भाजप आघाडीला 22 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे वाचलं का?

'मविआ'ला किती जागा?

महाविकास आघाडीच्या जागांपैकी काँग्रेसला 12 तर शिवसेनेच्या ठाकरे गटाला- शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 14 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या मतांच्या टक्केवारीबद्दल बोलायचं झालं तर काँग्रेसला 44 टक्के तर भाजपला 40 टक्के मते मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 

2019 चित्र काय?

महाराष्ट्रात 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपने राज्यातील 48 जागांपैकी सर्वाधिक 23 जागा जिंकल्या होत्या. यामध्ये शिवसेनेला 18, राष्ट्रवादीला 4 आणि काँग्रेसला फक्त एक जागा मिळाली होती. त्यामुळे मतांच्या टक्केवारींचे विश्लेषण करताना  भाजपची मतांची टक्केवारी ही 27.8 टक्के होती, तर शिवसेना 23.5 टक्के असल्यामुळे ती दोन नंबरवर होती. तर राष्ट्रवादीची 15.7 टक्के आणि काँग्रेसची 16.4 टक्के मते होती.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> BJP : कल्याणनंतर रायगडमध्ये महायुतीत वितुष्ट! भाजपनेच काढली तटकरेंची घराणेशाही

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT