Nana Patole: 'अशोक चव्हाणांसाठी आजही काँग्रेसचे दरवाजे खुले', पटोलेंची खुली ऑफर
राज्याचे दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. मात्र अजूनही काँग्रेसचे दरवाजे अशोक चव्हाणांसाठी खुले असल्याचं स्पष्ट मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
अशोक चव्हाणांनी माघारी यावं
अशोक चव्हाणांसाठी काँग्रेसचे दरवाजे खुले
Nana Patole: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काँग्रेसची (Congress) साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. काँग्रेसचा हात सोडून त्यांनी कमळ हातात घेतल्याने त्यांच्या पक्षांतरावर दोन्ही बाजूने चर्चा होत असल्या तरी आजही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मात्र त्यांना प्रेमाने आर्त हाक मारत त्यांनी त्यांना प्रेमानेही साद घातल्याचे नाना पटोले (Nana patole) यांनी सांगितले आहे.
ADVERTISEMENT
भाजपमध्ये जास्त काळ नाही
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाबाबत अनेक खुलासे केले आहेत. त्यांनी दोन्ही पक्षातील संस्कृती सांगत अशोक चव्हाण भाजपमध्ये जास्त काळ राहणार नाहीत असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
कमळ हाताने घ्यावं लागलं
व्हॅलेन्टाईन डेच्या आधीच अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे त्यांनी आज जरी कमळ घेतले असले तरी त्यांना ते कमळ पंजाच्या हातानेच घ्यावे लागले असा खोचक टोलाही त्यांनी लगावला आहे.
हे वाचलं का?
हे ही वाचा >> भाजपची मेधा कुलकर्णींना राज्यसभा! एका दगडाच दोन पक्षी
चव्हाणांवर काँग्रेसचे संस्कार
अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मात्र त्यांची वाढ, त्यांचे राजकारण हे सगळं काँग्रेसच्या संस्कारात गेलं आहे. त्यामुळ ते जास्त काळ भाजपमध्ये राहतील असं वाटत नाही अशी शक्यताही त्यांनी वर्तवली आहे. त्यामुळेच नाना पटोले यांनी त्यांना काँग्रेसतर्फे प्रेमाने हाक मारली आहे की, तुम्ही परत या.
काँग्रेसचे दरवाजे खुले
काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले अशोक चव्हाण यांना आम्ही कालही आणि आजही त्यांना प्रेमाने साद घालतो आहे की, तुमच्यासाठी काँग्रेसचे दरवाजे आजही खुले असून त्यांनी काँग्रेसमध्ये पुन्हा यावे असंही त्यांनी यावेळी सांगितले.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> पार्थ पवारांसाठी अजित पवारांची काय असणार रणनीति
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT