Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार का? पवारांचं मोठं विधान

मुंबई तक

ADVERTISEMENT

काँग्रेसमध्ये प्रादेशिक पक्ष विलीन होतील, असे विधान शरद पवार यांनी केले आहे.
काँग्रस नेते राहुल गांधी आणि शरद पवार.
social share
google news

Sharad Pawar on Regional Parties : शरद पवार यांनी केलेल्या एका विधानाने राजकीय वर्तुळात अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत. अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसच्या जवळ आले असून, त्यातील काही पक्ष विलीन होऊ शकतात, असं मोठं विधान पवारांनी केले आहे. त्यांच्या या विधानावर वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या असून, पवारांचं हे विधान कुणाबद्दल आहे, असा प्रश्नही उपस्थित होतं आहे. (Will NCP Sharad Chandra Pawar party merged with Congress? Sharad Pawar answered this question)

'इंडियन एक्स्प्रेस'ला शरद पवार यांनी मुलाखत दिली. या मुलाखतीत शरद पवारांनी हे विधान केले.

हेही वाचा >> "एकनाथ शिंदे 2013 मध्येच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते" 

"पुढील दोन वर्षात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेससोबत येतील किंवा त्यातील काही पक्ष त्यांच्यासाठी चांगला पर्याय म्हणून काँग्रेसमध्ये विलीन होण्याबद्दलही विचार करतील", असे विधान शरद पवार यांनी केले आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार का?

या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, "काँग्रेस आणि आमच्यात (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार) कोणताही फरक दिसत नाही, विचारधारेबाबत. आम्ही गांधी आणि नेहरूंच्या विचारधारेतूनच येतो."

मोदींशी जुळवून घेणे कठीण -शरद पवार

"सहकाऱ्यांशी बोलण्याशिवाय मी आताच काही सांगणार नाही. मी काही बोललं नाही पाहिजे. विचारधारेच्या दृष्टिकोनातून बघितलं तर आम्ही त्यांच्या जवळ आहोत. रणनीतीबद्दल किंवा पुढील वाटचालीबद्दल कोणताही निर्णय सामूहिकपणे घेतला जाईल. मोदींसोबत जुळवून घेणे किंवा त्यांना स्वीकारणे कठीण आहे", असे विधान शरद पवार यांनी केले आहे. 

ADVERTISEMENT

शरद पवारांनी समाजवादी काँग्रेस केली होती विलीन

१९७८ साली शरद पवारांनी काँग्रेसविरोधात बंड केलं होतं. त्यानंतर त्यांनी पुरोगामी लोकशाही दलाचे सरकार स्थापन केलं होतं. ज्याला पुलोद प्रयोग म्हटलं जातं. शरद पवारांनी समाजवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> बारामती कोणत्या पवारांकडे जाणार? घटलेल्या टक्क्याने वाढवली चिंता 

१९८६ पर्यंत हा पक्ष अस्तित्त्वात होता. १९८६ मध्ये त्यांनी हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला होता. राजीव गांधी यांनी मिळून काम करण्याचा आणि काँग्रेसमध्ये येण्याचा प्रस्ताव दिल्यानंतर शरद पवारांनी हा निर्णय घेतला होता. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT