Manoj Jarange: प्रकृती खालावली तरी, जरांगेंचा उपचार घेण्यास नकार! अंतरवालीत काय घडलं?

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

जालना : Manoj Jarange's Fourth Day of Protest : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा बेमुदत उपोषण सुरू केलं आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावामध्ये मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आज (11 जून) चौथा दिवस आहे. यावेळी मिळालेल्या माहितीनुसार त्यांची प्रकृती खालावली असून त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे. तसंच माध्यमांसमोर बोलताना त्यांनी सरकारवरही निशाणा साधला आहे. (jalna news manoj jarange refused to take treatment On the fourth day of maratha reservation protest his health condition deteriorated)

'गोड बोलून माझा काटा काढण्याचा सरकारकडून प्रयत्न', जरांगेंचे गंभीर आरोप!

'इकडे आमरण उपोषण सुरू आहे. सरकार गोड बोलून माझा काटा काढण्याचा प्रयत्न करत आहे.' असे गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर केले आहेत. 'राज्य सरकारला जाणीव असती तर मागणीची दखल घेतली असती. सरकारकडून खेळवणे सुरू आहे असं दिसतं. जर त्यांनी दखल घेतली नाही तर मराठे चांगला हिसका दाखवतील.' असा इशाराही यावेळी जरांगे पाटलांनी दिला. 

हेही वाचा: Modi 3.O: नव्या मंत्रिमंडळात महाराष्ट्राचं नुकसान, नेमकं कसं?

 

पुढे जरांगे पाटील म्हणाले, 'डॉक्टरांनी मला उपचार घेण्यास सांगितले आहे. पण, मी उपचार घेणार नाही. माझी भूमिका कायम आहे.' असं म्हणत त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला. 'तू थोडं थांब तुला कळेल', अशा शब्दात जरांगेंनी छगन भुजबळ यांनाही थेट इशारा यावेळी दिला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा:  "आमच्यामुळे भाजपच्या 18 जागा पडल्या", आंबेडकरांनी सांगितलं कारण 

 

'आमचा अजूनही मुख्यमंत्री शिंदेंवर विश्वास'       

'इतके दिवस सरकारचा सन्मान केला आणि इतके दिवस कायद्याचे पालन केले. आचारसंहिता असल्यामुळे उपोषण पुढे ढकललं होतं. आता आम्हाला सगे-सोयऱ्यांचा कायदा हवा आहे. गरिबांना वेठीस धरलं जात आहे. शिंदे मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे आमचा त्यांच्यावर अजूनही विश्वास आहे', असंही जरांगे पाटील स्पष्टच बोलले.

हेही वाचा: ''प्रधानमंत्रीजी, हमे हिंदू राष्ट्र चाहिए'', अभिनेत्री केतकी चितळेची मोदींकडे मागणी

 

मनोज जरांगे जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. 8 जूनपासून त्यांनी उपोषणाला सुरूवात केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आंदोलन पुढे ढकललं होतं. आचारसंहिता संपल्यानंतर लगेचच 8 जूनपासून ते उपोषणाला बसले. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT