Prakash Ambedkar : "आमच्यामुळे भाजपच्या 18 जागा पडल्या", आंबेडकरांनी सांगितलं कारण
Prakash Ambedkar on Lok Sabha elections 2024 : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबडेकर यांचे लोकसभा निवडणुकीबद्दल विश्लेषण
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४
वंचित बहुजन आघाडीला एकही जागा जिंकता आली नाही
प्रकाश आंबेडकर यांचे लोकसभा निवडणूक निकालावर भाष्य
Prakash Ambedkar on Maharashtra Lok Sabha Result : लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला सपशेल अपयशाला सामोरे जावे लागले. एकही जागा वंचित बहुजन आघाडीला जिंकता आली नाही. पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरही अकोल्यातून पराभूत झाले. दुसरीकडे महाविकास आघाडीला वंचितचा फटका बसू शकतो, असे म्हटले जात होते, पण मविआची कामगिरी चांगली झाली. भाजपला मात्र मोठा फटका बसला. नेमकं काय घडलं आणि भाजपच्या १८ जागा वंचितमुळे कशा पडल्या, याबद्दल आता प्रकाश आंबेडकरांनीच भूमिका मांडली. (Prakash Ambedkar claims that BJP lost 18 Seats in lok sabha because vanchit Bahujan aghadi)
बीबीसी मराठीला प्रकाश आंबेडकरांनी मुलाखत दिली. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालावर भाष्य केले.
हेही वाचा >> NDA च्या नव्या मंत्रिमंडळात महाराष्ट्राचं नुकसान, नेमकं कसं?
मतदारांनी वंचित बहुजन आघाडीचा पर्याय का निवडला नाही? तुमच्यामुळे भाजपला फायदा होतो, हा आरोप तुमच्यावर झाला. त्यामुळे तुमच्या हक्काच्या मतदारानेही महाविकास आघाडीचा पर्याय निवडला का?
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
प्रकाश आंबेडकर यांनी काय दिले उत्तर?
या प्रश्नाला उत्तर देताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "मूळात एक लक्षात घेतलं पाहिजे की, यावेळचे एनडीएचे विश्लेषण तुम्ही वाचलेले नाही. ते म्हणजे आमच्यामुळे (वंचित बहुजन आघाडी) भाजपच्या १८ जागा पडल्या. ओबीसीतील कोअर वोटर (मूळ मतदार) जो आमच्याकडे आहे. तो आमच्याकडे जसाच्या तसा राहिला आहे. त्यामुळे जे नरेटिव्ह तुम्ही सांगता. त्यातील वोटर जो गेला त्याचे एक कारण म्हणजे एक तर आक्रमकपणे आम्ही प्रचार केला नाही."
हेही वाचा >> 'गोड बोलून माझा काटा काढण्याचा प्रयत्न', जरांगेंचा गंभीर आरोप
"चॅलेनवरती आम्ही नव्हतो. वर्तमानपत्रातही आम्ही नव्हतो. आमचा प्रचार जो होता, तो सोशल मिडिया आणि कार्यकर्त्यांचा मीडिया. माझ्या मतदारसंघातही प्रसिद्धी माध्यमांचा फोकस जो होता, तो काँग्रेस आणि भाजपवरच होता", असे आंबेडकर म्हणाले.
ADVERTISEMENT
... तर आम्ही नांदेड, हिंगोली, शिर्डी आणि अकोला जिंकलो असतो
आंबेडकर पुढे म्हणाले की, "प्रसिद्धीसाठी प्रचंड खर्च लागतो. तो आमच्याकडे नव्हतो. इतके बजेट (पैसा) असते, तर चार जागा नांदेड, हिंगोली, शिर्डी आणि माझी (अकोला) या आम्ही काढू शकलो असतो", असं प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT