Vidhan Sabha : जयंत पाटलांचे महायुतीबद्दल गंभीर विधान; म्हणाले, "हा पळपुटेपणा..."

मुंबई तक

ADVERTISEMENT

जयंत पाटील यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून महायुती सरकारला तिखट शब्दात सुनावले.
जयंत पाटील यांची महायुतीवर टीका
social share
google news

बातम्या हायलाइट

point

जयंत पाटलांचा महायुती सरकारवर गंभीर आरोप

point

मराठा आरक्षण मुद्द्यावरून जयंत पाटलांनी सरकारला सुनावले

point

आरक्षण मुद्द्यावरून विधानसभेत प्रचंड गदारोळ झाला

Maratha Reservation : आरक्षणाच्या मुद्द्याचे विधानसभेत बुधवारी तीव्र पडसाद उमटले. सत्ताधारी महायुतीच्या आमदारांनी महाविकास आघाडीने बैठकीवर बहिष्कार टाकण्याचा मुद्दा उपस्थित केला. मराठा आरक्षणाबद्दल विरोधकांची भूमिका काय? असा सवाल करत महायुतीने विरोधकांना कोंडीत पकडले. या मुद्द्यावरून विधानसभेत प्रचंड गदारोळ झाला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज गुरूवारपर्यंत तहकूब करण्यात आले. याच मुद्द्यावरून जयंत पाटील यांनी महायुती सरकारचे कान टोचत गंभीर विधान केले. (Jayant Patil Reaction on Maratha Reservation after uproar in Maharashtra assembly) 

जयंत पाटील यांनी काय म्हटलं आहे? वाचा...

"94 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या एका शब्दाचीही चर्चा न करता मंजूर करण्यासाठी सभागृहात सत्तारूढ पक्षाने गोंधळ घातला आणि सभागृह तहकूब केलं. महाराष्ट्राच्या माथ्यावर 94 हजार कोटींचा नवा भुर्दंड मारण्यात आला आहे. या पुरवणी मागण्यांना विरोधीपक्ष नाकारतील याची खात्री असल्याने हा पळपुटेपणा महाराष्ट्र सरकारने केला आहे", अशा शब्दात जयंत पाटील यांनी सुनावले आहे.

हेही वाचा >> 'कुणाचा मेसेज आला होता?', विधानसभेत प्रचंड घमासान  

जयंत पाटील पुढे म्हणाले की, "काल सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. यापूर्वीही दोन बैठका झाल्या होत्या. महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी वारंवार भूमिका स्पष्ट केली होती. काल आरक्षणाच्या मथळ्याखाली बैठक बोलावण्यात आली होती. विधान परिषद आणि विधानसभेतील विरोधी पक्षांना विश्वासात घेऊन एकमताने या बैठका घेणे अपेक्षित होते. तर त्याला योग्य स्वरूप आले असते. मात्र त्यांनी कोणतीही चर्चा केली नाही", असा गंभीर आरोप जयंत पाटील यांनी महायुती सरकारवर केला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

कागांवा करण्याला अर्थ नाही -जयंत पाटील

"सरकारने मराठा आणि ओबीसी समाजातील घटकांशी चर्चा केली. त्यांनी याबतीत काहीतरी निर्णय घेतला पाहिजे. ठोस निर्णय न घेता, विरोधी पक्ष बैठकीला आला नाही याचा कांगावा करण्यात काहीच अर्थ नाही. तुमच्याकडे 206 आमदारांचे बहुमत आहे. त्यामुळे सभागृह चालवताना घाबरण्याचे काही कारण नाही", असे खडेबोल जयंत पाटील यांनी महायुतीला सुनावले आहे.

हेही वाचा >> पिता-पुत्राने ट्रेनसमोर उडी मारली अन्.. हादरवून टाकणारा VIDEO 

"आजच्या पुरवणी मागण्या अवैध मार्गाने मान्य केलेल्या आहेत. 6 लाख 70 हजार कोटींचे एक बजेट मांडून, दुसऱ्या मिनिटाला 94 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मांडल्या. ही महाराष्ट्रात आर्थिक गोंधळ निर्माण करणारी प्रवृत्ती आहे", अशा शब्दात जयंत पाटील यांनी महायुती सरकारला सुनावले आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT