Shivaji Maharaj Statue: ''जो चूक करतो, तोच माफी मागतो'', पुतळा दुर्घटनेवरून राहुल गांधी PM मोदींवर भडकले

मुंबई तक

ADVERTISEMENT

rahul gandhi criticized pm narendra modi appoligise chhtrapati shivaji maharaj malvam rajkot fort shivaji maharaj statue incident sangli patangrao kadam statue inaugration
पुतळा दुर्घटनेवरून राहुल गांधी कडाडले
social share
google news

बातम्या हायलाइट

point

''मोदींनी माफी मागून चालणार नाही''

point

''महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीची माफी मागितली पाहिजे''

point

पुतळा दुर्घटनेवरून राहुल गांधी कडाडले

Rahul Gandhi Criticized PM Narendra Modi : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची पुतळा कोसळल्याच्या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवरायांची माफी मागितली होती. या प्रकरणात आता काँग्रेस खासदार राहुल गांधी चांगलेच आक्रमक झाले आहेत. ''पंतप्रधानांनी मोदींनी शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे. त्यामुळे फक्त शिवरायांची माफी मागू चालणार नाही तर महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीची माफी मागितली पाहिजे. तसेच जो चुकतो तोच माफी मागतो'', असा हल्लाबोल राहुल गांधींनी (Rahul Gandhi) पंतप्रधान मोदींवर (Pm Narendra Modi) केला आहे. (rahul gandhi criticized pm narendra modi appoligise chhtrapati shivaji maharaj malvam rajkot fort shivaji maharaj statue incident sangli patangrao kadam statue inaugration) 

ADVERTISEMENT

राहुल गांधी यांनी सांगलीत काँग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. त्यावेळी आयोजित सभेत राहुल गांधी बोलते होते.  यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, ''आम्ही पतंगराव कदमजींच्या मुर्तीचे उद्घाटन केले. पतंगराव कदम यांनी 60 वर्ष समाजकारण केलं. इमानदारीने तुमच्यासोबत काम केले. पण या 60 वर्षात त्यांनी केव्हाही तुमच्याकडे माफी मागितली नाही. कारण माफी तोच मागतो जो चुकीचे काम करतो. त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी माफी मागितली. मोदींनी माफी मागितली याची वेगवेगळी कारण असू शकतात'', असे राहुल गांधी यांनी म्हणत ती कारणे देखील सांगितली. 

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : माझी लाडकी बहीण योजनेचा आता नवीन फॉर्म, लगेच मिळणार 4500 रुपये?

''पहिले कारण म्हणजे, या मुर्तीचे कॉन्ट्र्र्रक्ट आरएसएसच्या व्यक्तीला दिले गेले असेल. म्हणून त्यांनी माफी मागितली असावी. दुसरे कारण, मुर्ती बनवण्यात भ्रष्टाचार झाला किंवा चोरी झाली. म्हणून मोदी यासाठी माफी मागत असतील. मी ज्याला कॉन्ट्र्रक्ट दिले त्याने भ्रष्टाचार केला आणि महाराष्ट्राचा लोकांशी चोरी केली, म्हणून मोदी माफी मागत असतील असा'' हल्लाबोल राहुल गांधी यांनी मोदींवर केला. 

हे वाचलं का?

अदानी-अंबानीवरून घेरलं

''पंतप्रधानांनी हे देखील समजवलं पाहिजे तुम्ही फक्त दोन लोकांचं सरकार का चालवताय? कारण मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट अदानी आणि अंबानींना मिळतायत. पार्लमेंटमध्ये मी या दोघांची नावे  A1, A2ची  अशी नावे ठेवली आहेत. सगळी कामं ही   A1, A2ची  होतायत, त्यामुळे यासाठी कधी मोदींनी कधी माफी मागितली नाही'', असे राहुल गांधी यांनी सांगितले. 

हे ही वाचा : Jaydeep Apte: वकिलाच्या संपर्कात असलेला जयदीप आपटे पोलिसांना का नाही सापडला?.. नेमकं काय घडतंय

''अंबानी किंवा अदानी या देशाला रोजगार देऊ शकत नाहीत. हे भारताचे नवे मॉडेल आहे. चीनमधून वस्तू खरेदी करा. भारतातील छोटे व्यापारी ते करत आहेत. आता दोन भारत निर्माण होत आहेत. बेरोजगारांचा आणि गरिबांचा हिंदुस्थान हा मोदी आणि अदानींचा हिंदुस्थान आहे, असा टोला देखील राहुल गांधी यांनी मोदींना लगावला. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT