Lokpoll Survey : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी सर्वात मोठा सर्व्हे आला समोर! MVA उडवणार महायुती सरकारची झोप

मुंबई तक

ADVERTISEMENT

Lokpoll Survey For Maharashtra Assembly Elections
Lokpoll Survey For Maharashtra Assembly Elections
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लोकपोलच्या सर्व्हेमुळं राजकीय वर्तुळात तर्क वितर्कांना उधाण

point

महाराष्ट्रात कुणाचं पारडं जड? महाविकास आघाडी महायुतीचा पराभव करणार?

point

लोकपोलच्या सर्व्हेत उपस्थित केले महत्त्वाचे मुद्दे

Maharashtra Lokpoll Survey, Vidhansabha Election : येत्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु होणार आहे. या निवडणुकीत घवघवीत यश मिळवण्यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. राज्यातील अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरून महाविकास आघाडी महायुती सरकारवर निशाणा साधत आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने अपेक्षीत यश मिळवून महायुतीला दणकाच दिला. (The battle for Maharashtra Assembly elections will begin in the coming days. Or have all the parties started building a strong front to gain huge success in the elections)

अशातच आता लोकपोलच्या सर्व्हेतही अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले गेले आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटपाचा मुद्दाही कळीचा ठरणार आहे. तसच या निवडणुकीत एकूण 288 जागांसाठी उमेदवार रिंगणात उतरणार आहेत. तत्पूर्वी लोकपोलच्या सर्व्हेत महायुती,महाविकास आघाडी आणि इतर पक्षांच्या जागावाटप आणि मतदानाच्या आकडेवारीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

लोकपोलच्या सर्व्हेतील महत्त्वाचे मुद्दे

  • ग्रामीण भागातील समस्या, महागाई, भ्रष्टाचार, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात अपयश, महाराष्ट्रात विकासकामांचा अभाव आणि वाढती बेरोजगारी, या सर्व गोष्टींमुळं महायुती सरकारला जोरदार विरोध होत आहे.
  • काँग्रेस पक्षाला मोठं यश मिळाल्यानं भाजप समोर मोठं आव्हान राहणार आहे. परंतु, सामाजिक चळवळ राबवण्यात काँग्रेसकडे सातत्य नसल्याचं पाहायला मिळत आहे. 
  • भाजपला तीव्र विरोध होत आहे. महाराष्ट्रात आणि सरकारमध्ये अनेक समस्या निर्माण झाल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर आरोपांची राळ उडवली जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लोकप्रीयता वाढत आहे. 
  • महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला स्थलांतरीत होत असल्याच्या मुद्द्यावरून विरोधक सत्ताधाऱ्यांना धारेवर धरत आहे. राजकीय वर्तुळात हा मुद्दा महत्त्वाचा नरेटिव्ह आहे.
  • राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्षाला अधिकृत मान्यता मिळाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात ठाम भूमिका घेण्यात उद्धव ठाकरे यांना अपयश येत आहे.
  • वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम पक्षाची जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. पक्षवाढीसाठी सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याने इतर छोट्या पक्षांचाही त्यांना पाठिंबा मिळत आहे.

इथे पाहा विभागानुसार आकडेवारी

 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT