Ladki Bahin Yojana: 'काहीही फुकट...', लाडकी बहीण योजनेवर राज ठाकरेंचं सडेतोड विधान!
Raj Thackeray On Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु झाल्यापासून विरोधी पक्षांनी महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. काही महिलांच्या खात्यात अजूनही पैसे जमा न झाल्याने महाविकास आघाडीचे नेते राज्य सरकारला धारेवर धरत आहेत.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
राज ठाकरेंनी लाडकी बहीण योजनेबाबत दिली मोठी प्रतिक्रिया
राज ठाकरेंनी महायुती सरकारवर साधला निशाणा?
राज ठाकरे त्या कार्यक्रमात नेमकं काय म्हणाले?
Raj Thackeray On Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु झाल्यापासून विरोधी पक्षांनी महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. काही महिलांच्या खात्यात अजूनही पैसे जमा न झाल्याने महाविकास आघाडीचे नेते राज्य सरकारला धारेवर धरत आहेत. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही लाडकी बहीण योजनेबाबत मोठं विधान केलं आहे. ठाकरे एबीुुपी माझाच्या विशेष कार्यक्रमात म्हणाले, "माझं म्हणणं एवढंच आहे की, कोणतीही गोष्ट कोणालाही फुकट देऊ नये. कारण तुमच्याकडे कोणी फुकट काही मागत नसतं. महाराष्ट्रातील ज्या भगिनी आहेत त्यांना सक्षम बनवा ना. चांगले उद्योगधंदे आणा, त्यांच्याकडे त्यांच्या मेहनतीचे पैसे येऊ देत. त्या कुठे सांगतायेत मेहनतीशिवाय पैसे द्या म्हणून.."
राज ठाकरे पुढे म्हणाले, तुम्ही देतात.. ते खात्यात जातात म्हणून त्या घेतायेत. पण ते काही आवडतंय अशातला भाग नाही. उलट आपण लाचार बनवतोय. फुकट गोष्टी देऊन लाचार बनवतो, चुकीचं बनवतोय. उद्या तुम्ही तरुणांना पैसे द्यायला सुरुवात केलीत.. तो म्हणेल की बस झालं.. मला काय काम करायची गरजच नाही. पैसे मिळाल्यावर तो करेल काय.. तर ड्रग्स घेईल, काही घेईल..
हे ही वाचा >> Election 2024: तिकीट न मिळाल्याने श्रीनिवास वनगा 36 तासांपासून होते बेपत्ता! नेमकं घडलं तरी काय?
माझं असं म्हणणं आहे की, सरकारने हाताला काम देणं. महिला असतील किंवा कोणी असतील.. शेतकरी आमचा.. तो कुठे फुकट मागतोय. तो म्हणतो वीज सातत्याने द्या, पंप बंद पडणार नाही तेवढी गोष्ट बघा.. वीज थोडी कमी भावात द्या.. फुकट द्या असं कुठला शेतकरी बोललाय किंवा कोणता शेतकरी बोललाय सांगा मला.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> ladki Bahin Yojana: महिलांनो! खरंच दिवाळी बोनसचे 5500 मिळणार होते? काय आहे नेमकं सत्य?
दुसरी गोष्ट म्हणजे फुकट देण्याच्या गोष्टी या महिना दोन महिना चालतील.. पण महाराष्ट्र दिवाळखोरीला लागेल, कंगाल होईल महाराष्ट्र यातून. आज याच सगळ्या फुकटच्या योजनांवरून महाराष्ट्रावर 1 लाख कोटीचं कर्ज येईल. आधीची कर्ज फेडता येत नाही आणि आपण अजून कर्ज वाढतोय.. असं सरकार नाही चालणार, असंही राज ठाकरे म्हणाले.
ADVERTISEMENT