Nagpur Curfew : नागपूरमध्ये कर्फ्यू लागू, कोणकोणत्या परिसरात निर्बंध, काय काय बंद?
Nagpur Curfew : मुघल सम्राट औरंगजेबाची छत्रपती संभाजीनगरमध्ये असलेली कबर उखडून टाकण्याची मागणी हिंदू संघटना करत आहेत. हीच मागणी घेऊन काल विहिंप, बजरंग दल यांच्यासह वेगवेगळ्या संघटनांनी राज्यभर आंदोलन केलं. त्यानंतर शहरात घडलेल्या काही घडामोडींनंतर संध्याकाळी वातावरण तापलं होतं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

नागपूरमध्ये काल हिंसाचार, आज शहरात संचारबंदी

शहरातील कोणकोणत्या भागात निर्बंध?
Nagpur Curfew : औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीवरून नागपूरमध्ये काल तणाव निर्माण झाला. त्यानंतर पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या (BNS) कलम 163 अंतर्गत नागपूर शहरातील अनेक भागात कर्फ्यू लागू करण्याचे आदेश दिले आहेत. विश्व हिंदू परिषद (VHP) आणि बजरंग दलासह काही हिंदू संघटनांच्या सदस्यांनी निषेधादरम्यान धार्मिक संदेश (कलमा) लिहिलेले कापड जाळले अशी अफवा मुस्लिम धर्मीयांमध्ये पसरली होती. त्यानंतर काही वेळाने वातावरण चिघळलं होतं. दरम्यान, यानंतर अचानक परिसरात दगडफेक आणि जाळपोळ झाली.
हे ही वाचा >> Nagpur Violence: औरंगजेबाची कबर छ. संभाजीनगरमध्ये मग नागपूर अचानक का पेटलं?
कोणत्या भागात निर्बंध?
नागपूरचे पोलिस आयुक्त रविंद्र कुमार सिंगल यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिताच्या कलम 163 अंतर्गत संचारबंदी लागू केली आहे. त्यानुसार शहरातील कोतवाली, गणेशपेठ, तहसील, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोधरानगर आणि कपिलनगर पोलिस स्टेशन परिसरात संचारबंदी लागू आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत हे निर्बंध लागू राहतील. तसंच, या काळात अनेक शाळा आणि अस्थापना बंद राहणार असल्याची माहिती आहे.

नागपूरमध्ये काय घडलं होतं?
दुपारी 12 वाजता विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या 40 ते 50 कार्यकर्त्यांनी औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी निदर्शने केली.यावेळी कार्यकर्त्यांनी औरंगजेबाच्या पुतळ्याला हिरवी चादर चढवून त्याचे दहन केले.
हे ही वाचा >> नितेश राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यांची 'ही' यादी, राज्यातलं वातावरण कोण ढवळून काढतंय?
या घटनेनंतर मुस्लिम समाजात अशी अफवा पसरली की, जाळण्यात आलेल्या हिरव्या चादरीवर कुराणातील आयते लिहिलेली आहेत. हळूहळू मुस्लिम समाजात ही अफवा वेगाने पसरली. सायंकाळी 5 नंतर परिसरातील मुस्लिम तरुण जमा होऊ लागले. सायंकाळी सातच्या सुमारास मुस्लीम तरुण रस्त्यावर आले आणि त्यांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. काही वेळाने हजारो मुस्लिम तरुण आले आणि त्यांनी पोलिसांवर दगडफेक सुरू केली. त्यानंतर रात्री 12 वाजेपर्यंत परिस्थिती नियंत्रणात आली.