PUNE: ‘आता काय गचांडी धरु का?’ म्हणणाऱ्या अजितदादांचा चढला पारा, फडणवीसांवर थेट वार
पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या मुद्द्यावरुन विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. अजित पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही टीका केली आहे.
ADVERTISEMENT
Political News Headlines Today: पुणे: पुण्यात (Pune) गेल्या दोन आठवड्यात ज्या भयंकर घटना घडल्या आहेत. त्यामुळे अवघी पुणे नगरी हादरून गेली आहे. काही दिवसांपूर्वीच MPSC परीक्षेत राज्यात तिसऱ्या आलेल्या दर्शना पवार (Darshana Pawar) हिने लग्नाला नकार दिल्याने तिच्याच मित्राने निर्घृण हत्या (Murder) केली होती. तर आज (27 जून) पुण्यातील सदाशिव पेठेत एका कॉलेजवयीन मुलीवर तरुणाने थेट कोयत्याने भररस्त्यात हल्ला चढवला. या सगळ्या घटनांमुळे पुणेकरांमध्ये सध्या प्रचंड भीतीचं वातावरण आहे. याच मुद्द्यावरुन राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याबाबत संताप व्यक्त केला आहे. (ncp party ajit pawar criticized home minister devendra fadnavis increasing crime pune maharashtra govt)
ADVERTISEMENT
पुण्यात मागील काही महिन्यांपासून गुन्हेगारीमध्ये खूप वाढ झाली आहे. त्यामुळे पुणे हे आता क्राईम हब बनत चाललं आहे. पुण्यासारख्या शहराची होणारी बदनामी सहन झाल्याने आता अजित पवार हे मात्र चांगलेच संतापले आहेत. या सगळ्या घटनांबाबत अजित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन देवेंद्र फडणवीसांबाबत संताप व्यक्त केला आहे.
हे ही वाचा >> Dombivli Crime: भयंकर… चाकू हातात घेत मित्राचा पाठलाग, हत्येचं कारण काय?
‘विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात गुन्हेगारी प्रचंड प्रमाणात फोफावल्याचं चित्र आहे. गुन्हेगारांवर कायद्याचा अजिबात वचक राहिला नसल्याचं दिसतंय. दिवसाढवळ्या विद्यार्थिनींवर कोयत्यानं हल्ले होत आहेत. गृहमंत्र्यांनाही बहुधा राजकीय कलगीतुऱ्यातून कायदा व सुव्यव्यस्था हाताळण्यास वेळ मिळत नसावा. सुसंस्कृत म्हणून पूर्वापार ख्याती असलेलं पुणे इतकं हिंस्त्र झालेलं यापूर्वी कधीच पाहिलं नाही. या घटनेचा मी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करतो.’ असं ट्विट अजित पवारांनी यावेळी केली आहे.
हे वाचलं का?
‘त्या’ कान टोचणीनंतर अजित पवारांचा फडणवीसांवर निशाणा?
दरम्यान, अजित पवार हे आक्रमक विरोधी पक्ष नेते नाहीत असं खुद्द त्यांच्या पक्षातील नेतेच त्यांना सांगत असतात. याबाबत स्वत: अजित पवार यांनी आपल्या भाषणात म्हटलं होतं की, ‘काहीचं म्हणणं आहे की, तू कडक वागत नाही.. आता म्हटलं की… आता त्यांची गचांडी धरू की काय करू?’, म्हणजेच अजित पवार हे सरकारबाबत मवाळ भूमिका घेतात अशी काहींची तक्रार होती. याच कान टोचणीनंतर आज मात्र अजित पवारांनी पहिल्यांदाच फडणवीसांवर थेट निशाणा साधल्याचं पाहायला मिळतंय.
पुण्यातील सदाशिव पेठेतील थरार
तरुणीने बोलणं बंद केलं म्हणून मित्राने भर रस्त्यात तिच्यावर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना आज पुण्यातील सदाशिव पेठेतील पेरुगेट पोलीस चौकीजवळ ही घटना घडली. प्रेम प्रकरणातून तरुणाने हल्ला केल्याचं प्राथमिक माहितीत समोर आलं आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> NCP चे 70 हजार कोटींचे घोटाळे, सुप्रिया सुळे…, PM मोदींचा शरद पवारांवर पहिला ‘वार’
शंतनू जाधव असं हल्लेखोर तरुणाचं नाव आहे. या हल्ल्यावेळी त्या मुलीसोबत तिचा आणखी एक मित्र होता. तरुणी आणि तिचा मित्र गाडीवरुन चालले असताना हल्लेखोर तरुणाने त्यांना थांबवले, काही क्षणातच त्याने कोयत्याने वार करण्यास सुरुवात केली. हल्ला झाल्यानंतर तरुणी जीव मुठीत घेऊन धावायला लागली. यावेळी आरोपी शंतनूने तिच्यावर डोक्यावर कोयत्याने वार केला. ज्यानंतर ती जमिनीवर कोसळली. सुरुवातीला तिच्या मदतीला कोणी आलं नाही. मात्र, त्यानंतर रस्तावरील काही नागरिक मुलीच्या दिशेने धावून आले. जखमी अवस्थेत मुलगी धावत असताना लेशपाल जवळगे हा तरुण त्या तरुणीच्या मदतीला आला.
ADVERTISEMENT
कोयता हातात असलेला तरुण तरुणीवर वार करणार इतक्यात लेशपालने त्याच्या हातातील कोयता पकडला. त्यामुळे पुढचा मोठा अनर्थ टळला. त्यानंतर इतर नागरिकांनी त्या हल्लेखोराला पकडून बेदम मारहाण केली. पोलिसांनी हल्लेखोराला ताब्यात घेतलं असून पुढील कारवाई सुरु आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT