Bharat Ratna : इंदिरा गांधींना तुरुंगात टाकलं, नंतर त्यांच्याच पाठिंब्याने बनलेले PM! कहाणी चौधरी चरण सिंहांची
Chaudhary Charan Singh Bharat Ratna : इंदिरा गांधींनी ज्यावेळेस देशात आणीबाणी लागू केली होती, त्यावेळेस चौधरी चरण सिंह यांना तुरूंगात टाकण्यात आले होते. त्यानंतर सत्तेत आलेल्या जनता पक्षाच्या सरकारने इंदिरा गांधींना तुरुंगात टाकलं होतं. पुढे इंदिरा गांधींच्या पाठिंब्यानेच ते पुन्हा पंतप्रधान बनले.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
चौधरी चरण सिंह यांना मरणोत्तर भारतरत्न जाहीर
देशातील सर्वात मोठे शेतकरी नेते म्हणून ओळख
इंदिरा गांधीच्या पाठिंब्याने बनले होते पंतप्रधान
Chaudhary Charan Singh Bharat Ratna : काँग्रेसचे नेते, माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव (P V Narasimha Rao) , माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह आणि कृषी क्षेत्रात क्रांती घडवणारे डॉ. एम.एस. स्वामिनाथन (MS Swaminathan) यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर केल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली. देशातील सर्वोच्च नागरी पुरस्काराच्या या घोषणेनंतर सर्वाधिक चर्चाही चौधरी चरण सिंह (Chaudhary Charan Singh) यांची सुरु आहे. त्यामुळे नेमके चौधरी चरण सिंह कोण आहे? हे जाणून घेऊयात. (pm narendra modi declafre bharat ratna to chaudhary charan singh who is he jayant chaudharu rld india alliance read full story)
ADVERTISEMENT
खरं तर चौधरी चरण सिंह यांचे नातू आणि राष्ट्रीय लोकदलाचे प्रमुख जयंत चौधरी हे विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीचे एक घटक पक्ष आहेत. पण आता ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. तत्पुर्वीच पंतप्रधान मोदी यांनी चौधरी चरण सिंह यांनी मरणोत्तर भारतरत्न जाहीर केला आहे. या घोषणेनंतर आता जयंत चौधरी यांनी पंतप्रधान मोदींचे ट्वीट रिट्विट करत 'तुम्ही मन जिंकलेत' असे म्हणत त्यांचे कौतुक केले आहे. त्यामुळे आता ते इंडिया आघाडीला सोडणार असल्याचे राजकीय वर्तुळात निश्चित मानले जात आहे.
कोण आहेत चौधरी चरण सिंग?
देशातील सर्वात मोठे शेतकरी नेते म्हणून चौधरी चरण सिंग यांना ओळखले जातात. चौधरी चरण सिंग हे यूपीमधील बिगर-काँग्रेस सरकारचे पहिले मुख्यमंत्री बनले होते. काँग्रेसशी असलेले त्यांचे संबंध खूपच विचित्र होते. कारण इंदिरा गांधींनी ज्यावेळेस देशात आणीबाणी लागू केली होती, त्यावेळेस चौधरी चरण सिंह यांना तुरूंगात टाकण्यात आले होते. त्यानंतर सत्तेत आलेल्या जनता पक्षाच्या सरकारने इंदिरा गांधींना तुरुंगात टाकलं होतं. पुढे इंदिरा गांधींच्या पाठिंब्यानेच ते पुन्हा पंतप्रधान बनले. त्यामुळे चौधरी चरण सिंग नेमके कोण होते? आणि त्यांचे राजकारण कसे होते ते वाचूयात.
चरण सिंग यांचा जन्म उत्तरप्रदेशच्या हापूड येथील जाट कुटुंबात झाला. देशात स्वातंत्र्याची लढाई सुरु असताना त्यांनी राजकारणात प्रवेश केला होता.तसेच त्यांनी स्वातंत्र्य लढ्यातही महत्वाची भूमिका बजावली. 3 एप्रिल 1967 रोजी चौधरी चरण सिंग पहिल्यांदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनले. त्यानंतर वर्षभरानंतरच म्हणजेच 1968 मध्ये त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.
हे वाचलं का?
त्यानंतर मध्यावधी निवडणुका लागल्या आणि काँग्रेस पक्षाच्या पाठिंब्याने ते 17 फेब्रुवारी 1970 रोजी पुन्हा मुख्यमंत्री बनले. चरण सिंग नंतर केंद्र सरकारमध्ये गृहमंत्री झाले, त्यानंतर त्यांनी मंडल आणि अल्पसंख्याक आयोगाची स्थापना केली. पुढे त्यांनी 1979 मध्ये देशाचे उप पंतप्रधान आणि अर्थमंत्री म्हणून नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (नाबार्ड) ची स्थापना केली. 28 जुलै 1979 रोजी चौधरी चरण सिंग समाजवादी पार्टी आणि काँग्रेस (यू) च्या पाठिंब्याने देशाचे पाचवे पंतप्रधान बनले. उत्तर प्रदेशातील जमीन सुधारणांचे संपूर्ण श्रेय चौधरी चरण सिंग यांना दिले जाते. देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी जे काही करता येईल ते करू, असा त्यांचा पंतप्रधान होण्यामागचा विचार होता. चौधरी साहेब या नावाने प्रसिद्ध असलेले चरण सिंह यांचे 29 मे 1987 रोजी निधन झाले.
शेकऱ्यांसाठी नेहरूंच्या विरोधात गेले
ADVERTISEMENT
चौधरी चरणसिंग यांनी बालपणी जमीनदारी व्यवस्थेचा अनुभव घेतला होता. ज्यामुळे शेतकऱ्यांना अत्यंत गरीबीत आयुष्य काढावे लागले होते. शेतकऱ्यांवरील ही परिस्थिती त्यांच्यावर खोल जखम करून गेली. त्यानंतर त्यांनी ही परिस्थिती बदलण्याचे वचनच घेतले. आणि उत्तर प्रदेशमध्ये महसूल मंत्री म्हणून, चरण सिंग हे जमीनदारी निर्मूलन आणि जमीन सुधारणा कायदा, 1951 चे ते मुख्य शिल्पकार बनले.
ADVERTISEMENT
उत्तर प्रदेशात मंत्री असताना जवाहरलाल नेहरूंशी सहकाराच्या प्रस्तावित राष्ट्रीय धोरणावर त्यांनी उघडपणे विरोध करण्याचे धाडस दाखवले होते.या कारणामुळे त्यांना राजीनामाही द्यावा लागला होता. शेतकऱ्यांची समृद्धी हा त्यांच्यासाठी एक असा मुद्दा होता, ज्यावर त्यांचे लक्ष कधीही कमी झाले नाही, आणि हिच पुढे जाऊन त्यांची ओळख बनली.
आणीबाणीच्या काळात तुरुंगात टाकलं
इंदिरा गांधी यांनी ज्यावेळेस देशात आणीबाणी लागू केली होती. या आणीबाणीच्या काळात तब्बल 1 वर्षाहून अधिक काळ चौधरी चरण सिंह तुरुंगात होते. यानंतर इंदिरा गांधी यांचा पराभव करण्यासाठी त्यांनी विरोधी पक्षाचे नेतृत्व केले होते. आणीबाणीनंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत चरणसिंग यांच्या नेतृत्वाखालील भारतीय लोकदल पक्षाने (आरएलडी) जनसंघानंतर सर्वाधिक खासदार मिळवले. मोरारजींच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या सरकारमध्ये ते उपपंतप्रधान तसेच देशाचे गृहमंत्री झाले.
इंदिरा गांधींच्या पाठिंब्याने बनले पंतप्रधान
चौधरी चरण सिंग देशाचे गृहमंत्री झाल्यानंतर त्यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना अटक करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वात असलेले सरकार पडल्यानंतर इंदिरा गांधी यांनीच चरण सिंग यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला आणि हा प्रस्ताव स्विकार करण्यात आला, त्यानंतर चरण सिंग देशाचे पाचवे पंतप्रधान बनले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT