Rahul Gandhi : राहुल गांधींनी शाहू महाराजांची पोस्ट का केली शेअर?

मुंबई तक

ADVERTISEMENT

rahul gandhi share shahu maharaj post we have these demands inspired by the work
शाहू महाराजांचा माझ्यावर मोठा प्रभाव पडल्याच देखील राहुल गांधी यांनी सांगितले.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

शाहू महाराजांनी माझ्यावर मोठा प्रभाव पाडला

point

या आमच्या मागण्या शाहू महाराजांच्या आदर्शांनी प्रेरित

point

आजच्याच दिवशी शाहू महाराज यांनी एक ऐतिहासिक निर्णय घेतला

Rahul Gandhi Share Shahu Maharaj Post : लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी आज राजर्षी शाहु महाराज यांच्या संदर्भातली एक पोस्ट शेअर केली आहे.या पोस्टमध्ये राहुल गांधी यांनी शाहु महाराजांनी माझ्यावर मोठा प्रभाव पाडला असल्याचे म्हटलं आहे. पण नेमकं आजच्याच दिवशी राहुल गांधींना शाहू महाराजांची आठवण का झाली आहे. आणि राहुल गांधींच्या पोस्टमध्ये नेमकं काय आहे? हे जाणून घेऊयात. (rahul gandhi share shahu maharaj post we have these demands inspired by the work) 

''जातीय जनगणना, आरक्षणावरील 50 टक्के मर्यादा काढून टाकणे आणि उपेक्षितांसाठी न्याय, या आमच्या मागण्या शाहू महाराजांच्या क्रांतिकारी आदर्शांनी प्रेरित आहेत'', असे  काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी त्यांच्या एक्सच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. त्याचसोबत शाहू महाराजांचा माझ्यावर मोठा प्रभाव पडल्याच देखील राहुल गांधी यांनी सांगितले. 

हे ही वाचा : Narayan Rane : 'भाजपने 288 जागा लढवाव्या', शिंदे-अजितदादासोबतची युती तोडण्याचा राणेंचा सल्ला?

राहुल गांधीची पोस्ट जशीच्या तशी... 

सामाजिक न्यायासाठी राजर्षी शाहू महाराजांचे योगदान त्यांच्या काळाच्या खूप पुढे होते. देशातील सामाजिक न्यायाच्या लढ्यात एक अग्रणी, सामाजिक सुधारणांच्या त्यांच्या आजीवन कार्याचा माझ्यावर मोठा प्रभाव पडला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

राजर्षी शाहू महाराजांनी 1902 मध्ये याच दिवशी 'क्रांतिकारक राजपत्र' प्रकाशित करण्याचा निर्णय घेऊन शिक्षण सार्वत्रिक केले. तसेच शाहू महाराजांनी 50% नोकरीत आरक्षण देऊन समाजातील दुर्बल घटकांना बळ देण्याचे काम केले.शाहू महाराजांच्या पाठिंब्याचा आणि प्रयत्नांचा प्रभाव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर संविधानात आरक्षणाचा समावेश करण्यात आला.

जातीय जनगणना, आरक्षणावरील 50% मर्यादा काढून टाकणे आणि उपेक्षितांसाठी न्याय या आमच्या मागण्या शाहू महाराजांच्या क्रांतिकारी आदर्शांनी प्रेरित आहेत.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Guru Waghmare: 'स्पा'मध्ये हत्या, 'चुलबुल'नं मांडीवर 22 नावं का गोंदवलेली? चक्रावून टाकणारी Inside स्टोरी

दरम्यान 122 वर्षापुर्वी आजच्याच दिवशी म्हणजे 26 जुलै 1902 रोजी करवीर संस्थानाचे राजे, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी एक ऐतिहासिक निर्णय घेतला होता. 1902 मध्ये त्यांनी करवीर संस्थानात आदेश देत बहुजन समाजासाठी शिक्षण आणि नोकरीत 50 टक्के आरक्षण दिले होते. देशातला तो आरक्षणाचा पहिला निर्णय होता. या निर्णयाने सामाजिक सुधारणेच्या क्षेत्रात आमुलाग्र क्रांती झाली. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT