Team India : “वर्ल्ड कप जिंकलो असतो, पण पनौतीने…”, PM मोदींबद्दल राहुल गांधी काय बोलले?

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

Rahul Gandhi was targeting PM Modi by mentioning him in his public meeting in Jalore.
Rahul Gandhi was targeting PM Modi by mentioning him in his public meeting in Jalore.
social share
google news

Rahul Gandhi called panauti to pm Narendra Modi : भारताचा विश्व चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभव झाला. त्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. भारताच्या पराभवानंतर सोशल मीडियावर पनौती हा शब्द ट्रेंड झाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर नेटकऱ्यांनी रोष व्यक्त केला होता. आता याच शब्दाचा उल्लेख करत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदींवर शरसंधान साधलं.

ADVERTISEMENT

काँग्रेस नेते राहुल गांधी मंगळवारी (२१ नोव्हेंबर) प्रचारासाठी राजस्थानमधील जालौर येथे होते. या प्रचारसभेत बोलताना राहुल गांधींनी भारताच्या वर्ल्ड कपमधील पराभवाचाही उल्लेख केला. राहुल गांधी म्हणाले की, आपल्या मुलांनी वर्ल्ड कप जिंकला असता, पण पनौतीने हरवलं.”

नेमकं काय घडलं?

झालं असं की पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख करून राहुल गांधी टीका करत होते. त्याचवेळी सभेला आलेल्या काहींनी पनौती… पनौती… पनौती अशी घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर राहुल गांधींनी वर्ल्ड कपमधील भारताच्या पराभवाचा मुद्दा काढला. ते म्हणाले, “आमच्या मुलांनी सहज विश्वचषक जिंकला असता, पण पनौतीने त्यांना हरवले. टीव्हीवाले हे बोलणार नाही. पण जनतेला माहीत आहे.”

हे वाचलं का?

हे ही वाचा >> रोहितच्या ‘या’ 2 चुकांमुळे गेला World cup, गोलंदाजीवेळी झाली घोडचूक

पीएम मोदी यांना पाहून खेळाडू तणावाखाली आले -अजय राय

उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय राय यांनी विश्वचषकातील भारताच्या पराभवाचे खापर पंतप्रधान मोदींवर फोडले. ते म्हणाले, “मोदींना पाहून खेळाडू तणावाखाली आले. मोदींनी मॅच बघायला जायला नको होते. मोदींमुळे भारताचा पराभव झाला. कारण खेळाडू दबावाखाली आले. तेच पराभवाचे कारण ठरले. खेळाडूंचं मनोबल वाढवायचंच होतं तर विश्वचषकापूर्वी त्यांची भेट घ्यायची होती. पण, फायनलच्या मॅचला जायला नको होत.”

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> ‘…तेव्हा तुम्हाला धोनीची खरी किंमत कळेल’, नेहराचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

‘पनौती’ शब्द अचानक कसा आला चर्चेत?

वर्ल्ड कपमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा पराभव झाल्यानंतर अचानक पनौती हा शब्द ट्विटरवर ट्रेंड होऊ लागला. पंतप्रधान मोदी स्टेडियमवर येण्याबाबत विरोधी पक्षांनी हा शब्द वापरला असतानाच सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी आणि समर्थकांनी त्यावरून विरोधकांवर जोरदार प्रहार केला. विरोधी पक्षाचे म्हणणे आहे की, भारतीय संघ विश्वचषक हरला कारण पंतप्रधान मोदी सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचले. इतकंच नाही, तर सोशल मीडियावर अनेकांनी मोदींना अपशकून मानत नाराजी व्यक्त केली.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT