Rahul Kanal : ठाकरेंची साथ सोडून शिंदेंकडे आले, IT ने मारलेली धाड; कोण आहेत राहुल कनाल?

सुधीर काकडे

Rahul Kanal: कुणाल कामराच्या व्हिडीओमुळे संतापलेले शिवसैनिकांनी मुंबईतील खार भागात असलेल्या 'द हॅबिटॅट' स्टुडिओची तोडफोड केली होती. खार पोलिसांनी तोडफोड प्रकरणात एकूण 19 जणांना ताब्यात घेतलं होतं. यात राहुल कनाल यांचं नाव आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

कुणालच्या निषेधात सेटची तोडफोड केल्याप्रकरणी गुन्हा

point

कोण आहेत शिवसेना नेते राहुल कनाल?

point

कोणत्या प्रकरणात आयकर विभागाने टाकला होता छापा

Rahul Kanal Profile : स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराने केलेल्या व्यंगात्मक टीकेमुळे सध्या शिवसैनिक आणि एकनाथ शिंदे समर्थक संतापलेले आहेत. काल काही शिवसैनिकांनी थेट जिथे कुणाल कामराचा तो व्हिडीओ शूट झाला होता, तिथे जाऊन तोडफोड केली. यानंतर पोलिसांनी काही शिवसैनिकांनी ताब्यात घेतलं. यामध्ये एका नेत्याचं नाव होतं, ते म्हणजे राहुल कनाल.

मुंबईतील खार भागात असलेल्या 'द हॅबिटॅट' स्टुडिओची शिवसैनिकांनी काल तोडफोड केली होती. या प्रकरणी पोलिसांनी शिवसेना युवा सेनेचे सरचिटणीस राहुल कानल यांनाही ताब्यात घेतलं होतं. त्यामुळे सध्या राहुल कनाल चर्चेत आहेत.

ठाकरेंकडून शिंदेंकडे...

एकनाथ शिंदे यांच्यासाठी आक्रमक भूमिका घेणारे राहुल कनाल हे कधीकाळी ठाकरे कुटुंबाचे नीकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते. मात्र, जुलै 2023 मध्ये त्यांनी ठाकरेंची साथ सोडली आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने राहुल कनाल यांना त्यांच्या सोशल मीडिया मोहिमेचे राज्य प्रमुख म्हणून नियुक्त केलं होतं.

हे ही वाचा >> Kunal Kamra : एकनाथ शिंदेंनंतर कुणाल कामराचा मोदींवरही नाव न घेता निशाणा? नेमकं काय म्हणाला, वाचा...

राहुल कनाल हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतले एक महत्त्वाचे सदस्य होते. त्यांचे आदित्य ठाकरे यांच्याशी वैयक्तिक आणि व्यावसायिक संबंधही होते. शिवसेनेच्या युवा सेनेपासून त्यांनी कामाला सुरुवात केली होती. जवळपास 10 वर्ष ते  ठाकरे यांच्या नेतृत्वात काम करत होते.  मात्र, नंतर काही लोकांशी मतभेद असल्याच्या कारणावरुन ते शिंदेंच्या शिवसेनेत गेले. 

भाईजानझ् रेस्टॉरंटचा मालक

बॉलीवूड स्टार्ससोबत दिसणारे राहुल कनाल हे वांद्रे आणि सेलिब्रिटींच्या वर्तुळातला एक परिचित चेहरा आहेत. सलमान खानच्या नावावर असलेल्या भाईजानझ् रेस्टॉरंटचे ते मालक आहेत. या रेस्टॉरंटचे इतरही काही भागीदार आहेत. सलमान स्वतः या कॅफेमध्ये बऱ्याचदा येत असल्याचंही सांगितलं जातं. राहुल कनाल वांद्रे पश्चिमेतून विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारीही करत होते.

2022 मध्ये आयकर विभागाची कारवाई

राहुल कनाल यांनी सिव्हील लाईनमध्येही मोठी काम करत असल्याची माहिती आहे. तसंच आय लव्ह मुंबई नावाच्या एका संस्थेच्या माध्यमातून ते सामाजिक कामही करत असतात. श्री साईबाबा संस्थान ट्रस्टचे विश्वस्त म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. मार्च 2022 मध्ये जेव्हा आदित्य ठाकरे यांच्याशी संबंधीत अनेकांवर आयकर विभागाच्या धाडी पडल्या होत्या, त्यामध्ये राहुल कनाल यांचंही नाव होतं. ते आयकर विभागाच्या रडारवर होते.

सेलिब्रिटींसोबत वावर... 

राहुल कनाल अनेकदा सलमान खान, संजय दत्त, अनुष्का शर्मा, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आणि क्रिकेटपटूंसोबत भेटताना दिसतात. 

हे वाचलं का?

    follow whatsapp