Rohit Pawar ईडीसमोर हजर, सुप्रिया सुळे प्रचंड चिडल्या

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

rohit pawar ed enquiry supriya sule first reaction criticize mahayuti government maharashtra politics
rohit pawar ed enquiry supriya sule first reaction criticize mahayuti government maharashtra politics
social share
google news

Rohit Pawar Ed Enquiry : शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची आज ईडी चौकशी सूरू आहे. या ईडी चौकशीवर आता सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही काही चूक केली नाही. त्यामुळे चौकशीच्या दबावाखाली येण्याचा प्रश्नच येत नाही. ईडीची चौकशी पारदर्शक आणि निष्पक्ष असावी. माझा ईडीवर पूर्ण विश्वास आहे. रोहितची बाजू ऐकली जाईल, असा विश्वास सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला. (rohit pawar ed enquiry supriya sule first reaction criticize mahayuti government maharashtra politics)

ADVERTISEMENT

रोहित पवार यांना ईडी कार्यालयाबाहेर सोडल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती. सत्यमेव जयते. सत्याचा विजय होईलच, हा काळ आमच्यासाठी संघर्षाचा आहे.त्याच्यामुळे आव्हान येत असतील, त्या आव्हानावर मात करायची आहे, संघर्ष करू पण सत्याच्याच मार्गाने चालू. हा विचार कैलाशवासी यशवंतराव चव्हाण यांचा आहे. जो वारसा आहे तो पुढे न्यायच काम शरद पवार यांनी सहा दशके केले आणि तोच महाराष्ट्राचा अभिमान आहे आणि आजची तीच लढाई सुरू असल्याचा देखील निर्धार सुप्रिया सुळे यांनी केला.

हे ही वाचा : Ram Mandir : राऊतांनी फडणवीसांना पुन्हा डिवचलं, ‘ते कुठल्याही स्टेशनला फोटो…’

संसदेचा एक अधिकृत अहवाल आहे, त्या अहवालानुसार,इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी याच्या 90 ते 95 केसेस या विरोधी पक्षांवर आहेत. त्यामुळे अनेक यंत्रणाचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला. रोहितला नोटीस येणे काही आश्चर्याची गोष्ट नाही. रोहित नवीन पिढीसाठी काही तरी करू इच्छितो, त्यामुळे हे सुडाचे राजकारण असू शकते,असा आरोप देखील सुप्रिया सुळे यांनी सत्ताधाऱ्यांवर केला.

हे वाचलं का?

हे ही वाचा : Uddhav Thackeray : आशिष शेलारांची ठाकरेंवर जोरदार टीका, ‘वाचाळवीरांची…’

आम्ही काही चूक केली नाही. त्यामुळे चौकशीच्या दबावाखाली येण्याचा प्रश्नच येत नाही. ईडीची चौकशी पारदर्शक आणि निष्पक्ष असावी. माझा ईडीवर पूर्ण विश्वास आहे. रोहितची बाजू ऐकली जाईल, असा विश्वास आहे. सर्व एजन्सींना पूर्णपणे सहकार्य करत आहोत. कारण आमच्याकडे लपवण्यासारखे काहीही नाही, असे देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT