शिंदेंच्या शिवसेनेकडून राज्यसभेचा उमेदवार जाहीर, 'या' नेत्याला दिली संधी

ADVERTISEMENT

eknatha shinde shiv sena
eknatha shinde shiv sena
social share
google news

Shiv sena: राज्यातील राजकारण अनेक कारणांनी ढवळून निघालं असतानाच आज राज्यसभेसाठी काँग्रेस, शिवसेना, भाजपकडून नावं जाहीर करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसला धक्के बसत आहेत. काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते शिवसेना आणि भाजपमध्ये गेल्यामुळे काँग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली. मिलिंद देवरा यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेत प्रवेश करत काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर आजच त्यांना शिंदेंच्या शिवसेनेकडून राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर भाजपमधून अशोकच चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजित गोपछडे यांचीही उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

देवरांचं नाव जाहीर

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणून मिलिंद देवरा यांची ओळख होती, मात्र काही दिवसापूर्वी शिंदे गटाच्या शिवसेनेत आलेल्या मिलिंद देवरा यांना राज्यसभा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. 

हे ही वाचा >> शरद पवारांचं ठरलं! पुण्यातील बैठकीत झाला मोठा निर्णय

भाजपचे उमेदवारही जाहीर

काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये मिलिंद देवरा यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेनेसोबत भाजपने राज्यसभेसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी आमदार मेधा कुलकर्णी, अजित गोपछडे यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे.
 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

सलग दोन वेळा विजय

मिलिंद देवरा हे दक्षिण मुंबई मतदारसंघातील मोठं नेतृत्व समजलं जाते. त्यांनी काँग्रेसमधून लोकसभा निवडणुकीत 2004 आणि 2009 असे सलग दोन वेळा विजय मिळवला होता. मिलिंद देवरा यांना 2014 मध्ये ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून म्हणजेच अरविंद सावंत यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता.

हे ही वाचा >> काँग्रेसचा राज्यसभा निवडणुकीचा उमेदवार ठरला!

    follow whatsapp

    ADVERTISEMENT