Sanjay Raut : “…तेव्हा शिंदे ठाण्यात नगरसेवक होते”, राऊतांनी काढला इतिहास

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

Sanjay Raut has targets election commission and eknath shinde on row of bow and arrow
Sanjay Raut has targets election commission and eknath shinde on row of bow and arrow
social share
google news

Sanjay Raut On Eknath Shinde : पत्रकारांनी प्रश्न विचारला राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल आणि खासदार संजय राऊतांनी इतिहास काढला एकनाथ शिंदेंचा. याला कारण ठरलं निवडणूक आयोगाचा निकाल. शिवसेना नाव आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्ह आयोगाने एकनाथ शिंदेंच्या गटाला दिलं. त्यावरूनच राऊतांनी आयोगावर तोफ डागली. पत्रकार परिषदेत ते काय बोलले, तेच वाचा… (MP Sanjay Raut Hits Out at Eknath Shinde. Raut also criticised Election commission of India)

ADVERTISEMENT

झालं असं की, नेहमीप्रमाणे संजय राऊतांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ‘सुप्रिया सुळे म्हणताहेत की निवडणूक आयोगावर विश्वास आहे. दुसरीकडे प्रफुल्ल पटेल तारखा देत आहेत. याकडे तुम्ही कसं पाहता?’, असं राऊतांना विचारण्यात आलं.

त्यानंतर राऊतांनी निवडणूक आयोगाच्या निकालावरच प्रश्न उपस्थित केले आणि भाजपच्या केंद्रीय नेत्यांनाही सुनावलं.

हे वाचलं का?

हेही वाचा >> लेडी कॉन्स्टेबलचा दाबला गळा, नाल्यात फेकली बॉडी अन् फेक कॉल…; गूढ उलगडल्यावर पोलिसांनाही फुटला घाम

राऊत म्हणाले, “या अनुभवातून शिवसेना गेली आणि जातेय. निवडणूक आयोगाच्या माध्यमातून भाजप, त्यांचे दिल्लीतील राज्यकर्ते खेळ खेळताहेत. घटनात्मक आणि संविधानिक पदांवरील व्यक्तींचा ताबा घ्यायचा आणि आपल्याला हवे ते निर्णय घ्यायचे. एक सर्वोच्च न्यायालय सोडलं, तर बाकी सगळं त्यांच्या हातामध्ये आलेलं आहे.”

राऊतांनी सांगितलं की,”शिवसेना फुटली. 40 आमदार सोडून गेले. या एका भूमिकेवर निवडणूक आयोगाने शिवसेना शिंदे गटाच्या ताब्यात दिली. हा सरळ सरळ अन्याय आहे. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केली. 55 वर्षांनंतर शिवसेनेची सुत्रं अधिकृतपणे उद्धव ठाकरे यांच्या हातात आली.”

हेही वाचा >> आशिष शेलार पुन्हा म्हणाले, ‘आदू बाळ; कवितेतून आदित्य ठाकरेंच्या वर्मावर ‘बाण’

एकनाथ शिंदे आमदार असावेत…

शिंदे गटाला खरी शिवसेना म्हणून मान्यता देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयावरून राऊत संतापले आणि म्हणाले की, “उद्धव ठाकरे यांच्या हातात आली, तेव्हा आजचे एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या कार्यकारिणीतही नव्हते. ते ठाण्यात नगरसेवक होते. शिवसेना त्यांची कशी झाली? बाळासाहेब ठाकरेंच्या निधनावेळी शिंदे आमदार असतील, शिवसेनेचे नेते नव्हते. आज अचानक हा निवडणूक आयोग शिवसेना एकनाथ शिंदेंची सांगतो.”

ADVERTISEMENT

“सुप्रिया सुळेंची भीती… सर्वोच्च न्यायालय अजूनही…”

“हे कुणाचं तरी दुकान आहे. सुप्रिया सुळे यांची भीती रास्त आहे. इथे काहीही होऊ शकतं. त्या काळात शिंदे गटाचे लोक तारखा द्यायचे. निर्णय आमच्या बाजूने लागणार, हाच निर्णय लागणार, चिन्ह आणि पक्ष आम्हाला मिळणार, हे तुम्ही कोणत्या आधारावर सांगत होतात? जणू काही यांना निवडणूक आयोगाचे सदस्य केले होते. आज बहुतेक काही काळापुरतं प्रफुल्ल पटेलांना भाजपने निवडणूक आयोगाचं सदस्य केले आहे. पण, लक्षात घ्या, सर्वोच्च न्यायालय अजून जिवंत आहे. न्याय अजून मेलेला नाही”, अशी भूमिका राऊतांनी यावर मांडली.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT