Chahatrapati Shivaji Maharaj: पाऊस, वारा झेलत प्रतापगडावर शिवरायांचा पुतळा आजही दिमाखात उभा!, पं. नेहरूंनी केलेलं लोकार्पण

निलेश झालटे

ADVERTISEMENT

पं. नेहरूंनी लोकर्पित केलेला शिवरायांचा पुतळा पाऊस, वारा झेलूनही उभा कसा?
पं. नेहरूंनी लोकर्पित केलेला शिवरायांचा पुतळा पाऊस, वारा झेलूनही उभा कसा?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

प्रतापगडावरील शिवाजी महाराजांचा पुतळा दिमाखात उभा

point

मालवणमधील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर मोदी सरकारवर जोरदार टीका

point

प्रतापगडावरील पुतळ्याचा दाखला देत सरकाराल केलं जातंय ट्रोल

प्रतापगड: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फुटांचा भव्य पुतळा राजकोट किल्ल्याच्या परिसरात उभारण्यात आला होता. हा पुतळा सोमवारी अचानक कोसळला. मालवणमधील महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर त्या पुतळ्याचा आकार, दिसणं याची जास्त चर्चा होत आहे. आठ-दहा महिन्यात पंतप्रधानांनी स्वतः लोकार्पित केलेला पुतळा भीषण पद्धतीनं कोसळतो ही खेदाची बाब आहे, अशा प्रकारच्या प्रतिक्रियांचा महापूर आल्याचं सध्या दिसून येतंय. (statue of shivaji maharaj on pratapgad with wind and rain is still standing brightly pandit jawaharlal nehru unveiled it criticism of modi government after incident in sindhudurg)

अर्थातच या घटनेनंतर जोरात राजकारण सुरु झालं आहे. आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मात्र हा पुतळा कोसळल्यानंतर माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी लोकार्पित केलेल्या प्रतापगडवरील पुतळ्याची जोरदार चर्चा होते आहे. ही चर्चा का होत आहे, राजकारण काय आहे? हेच आपण सविस्तर जाणून घेऊया.

प्रतापगडावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची नेमकी कहाणी

पंतप्रधान ज्या पुतळ्याचं उद्घाटन करतात अशा पुतळ्याला अवघं एक वर्ष देखील सांभाळलं गेलं नसल्याचं समोर आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 4 डिसेंबर 2023 रोजी मोठ्या थाटामाटात नौदल दिनाच्या निमित्ताने या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलं होतं. पण अवघ्या 8 महिने 22 दिवसांत शिवरायांचा पुतळा कोसळला. यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Chhatrapati Shivaji Maharaj: शिवाजी महाराजांच्या 'त्या' पुतळ्यासाठी शिंदे सरकारने किती कोटी दिलेले?

आता या घटनेनंतर पंडित नेहरुंच्या हस्ते लोकार्पित झालेल्या प्रतापगडच्या पुतळ्याची चर्चा होते आहे. या लोकार्पणासंदर्भात अभिनेते किरण मानेंनी एक किस्सा सोशल मीडियावर लिहिला आहे. 

त्यांनी म्हटलंय. प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जो सुंदर, चित्ताकर्षक पुतळा आहे, त्याला येत्या नोव्हेंबर मध्ये 67 वर्ष पूर्ण होतील... गेली सात दशकं तब्बल एकशेवीसच्या वेगाने येणारे वारे झेलत हा पुतळा आजही दिमाखात उभा आहे! या पुतळ्याचं उद्घाटन केलं होतं पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी! 

ADVERTISEMENT

फलटणचे श्रीमंत मालोजीराजे नाईक-निंबाळकर यांना सतत एका गोष्टीची खंत होती की छत्रपतींच्या शौर्याची, पराक्रमाची साक्ष देत उभ्या असलेल्या प्रतापगडावर शिवरायांचं स्मारक नाही! त्यांनी ही खंत त्यावेळचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना बोलून दाखवलेली. यशवंतरावांना हे मनोमन पटलं. तातडीने हालचाली करून राजभवनात मिटींग घेऊन प्लॅन ठरला. पं. नेहरूंचीही तात्काळ मान्यता मिळाली. त्यावेळी गडावर जाण्यासाठी रस्ते नव्हते. प्रचंड मेहनत घेऊन, अनेक अडचणींवर मात करून, तब्बल दोन वर्ष युद्धपातळीवर हालचाली करून हे स्मारक उभं राहिलं. पंडितजी स्वत: या उद्घाटनाला आले. त्यावेळी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू होती. यावेळी पंडित नेहरूंनी स्वत:चा मार्ग बदलून कास पठारमार्गे प्रतापगडावर आले, उद्घाटन केलं.

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Sanjay Raut: 'मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, शिवरायांचा असा अपमान मुघलांनीही केला नाही', संजय राऊत संतापले!

प्रतापगडावरील पुतळा खरोखरच ऊन, वारा, पाऊस झेलत आज 67 वर्षांनीही दिमाखात उभा आहे. 

दुसरीकडे मालवणमध्ये पुतळा कोसळला आणि आता टोलवाटोलवी सुरू झाली आहे. यांचं टेंडर कसं निघालं? काम कसं दिलं गेलं? कसं केलं गेलं? या सगळ्याची उत्तरं मिळणं गरजेचं आहे. या घटनेबद्दल मंत्री दीपक केसरकर म्हणतात 'छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला हा अपघात आहे आणि कदाचित वाईटातून काही चांगल घडेल म्हणून पण हा अपघात झाला असेल!' पण आता काय चांगलं घडेल हे पाहणं महत्त्वाचं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT