Rohit Pawar : ''जरांगेंना रोहित पवार, टोपेंनी आंदोलनाला बसवले'', भुजबळांच्या आरोपांवर शरद पवार गटाचं आव्हान

मुंबई तक

ADVERTISEMENT

rohit pawar vs chhagan bhujbal manoj janrange patil antarwali sarati agitation big allegation maratha reservation
राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ शनिवारी माध्यमांशी बोलत होते.
social share
google news

Chhagan Bhujbal Vs Rohit Pawar : प्रवीण ठाकरे, नाशिक : आंतरवाली सराटीतील लाठीचार्जनंतर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) आपल्या घरामध्ये जाऊन झोपले होते.पण रोहित पवार आणि राजेश टोपे यांनी त्यांना तेथून उठवून पुन्हा आंदोलनस्थळी बसवले असा गंभीर आरोप अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांनी केला होता. भुजबळांच्या या आरोपावर आता शरद पवार गटाने प्रतिक्रिया दिली आहे. ''गृहमंत्र्यांना सांगून माझ्यावरील आरोप सिद्ध करून दाखवा'', असे थेट आव्हान आमदार रोहित पवारांनी (rohit pawar) भुजबळांना दिले आहे. आता हे आव्हान भुजबळ स्विकारतात का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (rohit pawar vs chhagan bhujbal manoj janrange patil antarwali sarati agitation big allegation maratha) reservation 

राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ शनिवारी माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना भुजबळ म्हणाले की, आंतरवाली सराटीत ज्या वेळेस दगडफेक आणि लाठीचार्ज झाला. त्यावेळेस जरांगे तिथून निघून गेला. आणि राष्ट्रवादीचे दोन आमदार रोहित पवार आणि राजेश टोपे या दोघांनी तिथे परत जरांगेंना आणून बसवलं. त्यानंतर  पवार साहेबांना तिथे बोलावलं गेले, पवार साहेब गेले म्हणून उद्धव ठाकरे गेले. या दोन्ही नेत्यांना या घटनेची कल्पना नव्हती. पण हे दोन्ही नेते गेल्यामुळे एकच बाजू जनतेच्या पुढे आली, त्याचा फायदा जरांगेंना मिळाला. - या दोघांचा त्याच्यात हात आहे असं तिथे लोकांचं म्हणणं आहे, असा आरोप भुजबळांनी केला होता. 

हे ही वाचा : Eknath Shinde : '...तर लाडकी बहीण योजनेचे पैसे दुप्पट करू', धाराशीवमध्ये शिंदे काय म्हणाले?

भुजबळांच्या या आरोपावर आता रोहित पवारांनी एक्सवर ट्विट करून पलटवार केला आहे. नेमकं रोहित पवार काय म्हणाले आहेत? हे जाणून घेऊयात. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

रोहित पवारांचं ट्विट जशाचं तसं... 

आदरणीय भुजबळ साहेब,

सामाजिक प्रश्नासाठी सामाजिक कार्यकर्ता लढत असताना राजकीय आरोप करून सामजिक कार्यकर्त्याची बदनामी करणे आपल्या सारख्या जेष्ठ नेत्याला शोभत नाही. शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर 2 सप्टेंबर रोजी सरकारने अमानुष लाठीचार्ज केल्याने त्या भागात नागरिकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण होते, त्यामुळे मी स्वतः रात्री अडीच वाजता जाऊन त्या भागातील हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमींची विचारपूस केली, धीर दिला. जरांगे पाटील यांच्या कुटुंबाला धीर दिला, यात चुकीचे काय आहे का?

ADVERTISEMENT

ओबीसींचे राजकीय आरक्षण संपवणाऱ्या भाजपला टोकाचा विरोध करणारा आपल्यासारखा जेष्ठ नेता आज माझ्यावर तसेच राजेश टोपे साहेबांवर ‘ज्यांच्या  सांगण्यावरून आरोप करत आहेत त्याच नेत्याच्या’ हातात आज गृहमंत्रालय आहे. त्यामुळे त्यांना सांगून माझ्यावरील आपण केलेले आरोप सिद्ध करून माझ्यावर कायदेशीर कारवाई  करायला सांगा, हे माझे आपणास जाहीर आव्हान आहे.

ADVERTISEMENT

असो! हा शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र आहे. त्यामुळे दोन समाजात भांडणे लावण्याचा उचललेला विडा खाली ठेवा आणि महाराष्ट्राच्या जनतेला सुखाने नांदू द्या तसेच भाजप नेत्यांच्या नादाला लागून महाराष्ट्राची वाट लावण्यापेक्षा जनतेच्या खऱ्या समस्यांकडे लक्ष द्या,  ही विनंती.

रोहित पवारांनी केलेल्या पलटवारावर आता भुजबळ काय उत्तर देणार? तसेच भुजबळ रोहित पवारांचे आव्हान स्विकारणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.   

हे ही वाचा : Eknath Khadse : ''भाजप नेता मुलीसोबत चाळे करतानाचा व्हिडिओ...'', खडसेंच्या दाव्यानंतर खळबळ

    follow whatsapp

    ADVERTISEMENT