Sukhbir Singh Badal attack Video : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर गोळीबार, सुवर्ण मंदिराच्या गेटवरच...

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंह बादल यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना झाली आहे. अमृतसरमध्ये सुवर्णमंदिराच्या गेटवरच त्यांच्यावर हा गोळीबार झाला अशी माहिती समोर आली आहे. या घटनेनं परिसरात अत्यंत गोंधळ झाला असून, हल्लेखोरांना लोकांनी पकडल्याची माहिती आहे. या घटनेनं पंजाबसह राजकीय वर्तुळाला मोठा धक्का बसला आहे.
 

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Girgaon Marathi Vs Marwadi : "...अशे प्रकार खपवून घेणार नाही", मराठीला विरोध करणाऱ्याला मनसेचा चोप, मंगलप्रभात लोढा म्हणाले...'


सुखबीरसिंह बादल यांनी आपल्या उपमुख्यमंत्रिपदाच्या काळात केलेल्या काही चुकांमुळे त्यांना अकाल तख्तकडून शिक्षा सुनावण्यात आली होती. यादरम्यान, त्यांना टॉयलेट साफ करणे, गेटवर पहारेकरी म्हणून उभं राहणे, स्वच्छता करणे अशी शिक्षा सुनावण्यात आली होती. काल त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर आज सकाळी ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचं संपूर्ण दृष्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे. 

हल्लेखोराने गोळीबार करताच घटनास्थळी उपस्थित लोकांनी त्याला पकडलं. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे. त्याच्याकडून एक पिस्तूलही जप्त करण्यात आलं आहे. नारायण सिंह चौरा असं आरोपीचं नाव आहे. 
 

हे वाचलं का?

 

 

ADVERTISEMENT

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोराचे नाव बब्बरअसून, तो खालसा इंटरनॅशनलचा (BKI) माजी सदस्य होता. तो 1984 मध्ये पाकिस्तानात गेला होता आणि पाकिस्तानमधून पंजाबमध्ये शस्त्रास्त्रे आणि स्फोटकांची तस्करी करत असल्याचंही बोललं जात असल्याचं समोर आलं आहे. त्याने 'गनिमी युद्धावर एक पुस्तकही लिहिलं' आहे. बुडैल जेलब्रेक प्रकरणातीलही तो आरोपी आहे. पंजाबच्या तुरुंगातही त्याने शिक्षा भोगली आहे असं वृत्त 'आज तक'ने दिलं आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT