Vidhan Parishad Maharashtra : मुंबई ठाकरेंचीच! पदवीधर मतदार संघात अनिल परब विजयी, कोकणचा गड भाजपने राखला

मुंबई तक

ADVERTISEMENT

thackeray group candidate anil parab win mumbai gruduate constituency bjp niranjan davkhare won konkan constituency
मुंबई पदवीधर मतदार संघात ठाकरेंचे उमेदवार अनिल परब यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे.
social share
google news

Vidhan Parishad Maharashtra : मुंबई पदवीधर मतदार संघातून ठाकरेंचे उमेदवार अनिल परब विजयी झाले आहेत. परब यांनी किरण शेलार यांचा पराभव केला आहे. अनिल परब यांनी स्वत:च एक्सवर विजयाचे बॅनर देखील शेअर केले आहे. तर कोकण पदवीधर मतदार संघात भापजच्या निरंजन डावखरे यांनी तिसऱ्यांदा विजय मिळवत आपला गड कायम राखल्याचे सांगितले जात आहे.  (thackeray group candidate anil parab win mumbai gruduate constituency bjp niranjan davkhare won konkan constituency)  

मुंबई पदवीधरमध्ये ठाकरेंकडून अनिल परब आणि भाजपचे किरण शेलार यांच्यात थेट लढत होती. या लढतीत अनिल परब यांना पहिल्या फेरीत 18 हजार 774 मते पडली होती. तर किरण शेलार यांना 7575 मते मिळाली. दुसऱ्या फेरीत परब यांना 18 हजार 371 मते मिळाली. तर शेलार यांना 7917 मते पडली. तिसऱ्या फेरीत परबांना 7 हजार 639 मते मिळाली आणि शेलार यांना 3220 मते मिळाली. तीन फेरीतील मतदानानुसार परबांना 44 हजार 784 मते पडली आणि शेलारांना 18772 मते पडली. त्यामुळे 26 हजार 12 मतांनी परब विजयी झाले आहेत. 

हे ही वाचा : Vidhan Parishad Election : भाजपने उमेदवारी दिलेले अमित गोरखे कोण?

कोकण पदवीधरमध्ये भाजपचे निरंजन डावखरे आणि काँग्रेसच्या रमेश किर यांच्यात सामना आहे. कोकण पदवीधर मतदार संघात निरंजन डावखरे यांची विजयाकडे वाटचाल सुरू आहे. त्यामुळे मुंबई पदवीधर मतदार संघाची जागा ठाकरेंना तर ठाण्यात कोकण पदवीधरची जागा भाजपला राखण्यात यश आलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : संभाजी भिडे पुन्हा बरळले, महिला म्हणाल्या, ''भिडेच्या मिशाच कापून टाकू''

    follow whatsapp

    ADVERTISEMENT