Vidhan Parishad Election : पंकजा मुंडे आमदार होणार, भाजपने 'या' 5 नेत्यांना दिली उमेदवारी

मुंबई तक

ADVERTISEMENT

vidhan parishad election 2024 bjp declare candidate list pankaja munde sadabhau khot parinay fuke yogesh tilekar amit gorkhe
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
social share
google news

Vidhan Parishad Election,Pankaja Munde Candidancy: विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना विधान परिषदेसाठी (Vidhan Parishad Election) उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पंकजा मुंडे याच्यासोबत आणखीण 4 नेत्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. हे नेते कोण आहेत हे जाणून घेऊयात. (vidhan parishad election 2024 bjp declare candidate list pankaja munde sadabhau khot parinay fuke yogesh tilekar amit gorkhe) 

ADVERTISEMENT

विधानपरिषदेच्या रिक्त झालेल्या 11 जागांसाठी  निवडणूक होणार आहे. यामध्ये भाजपच्या वाट्याला 5 जागा आल्या होत्या. त्यामुळे आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये भाजपने बीड लोकसभा मतदार संघातून पराभूत झालेल्या पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर केली आहे. या उमेदवारीनंतर पंकजा मुंडे यांचे पुनर्वसन होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान पंकजा मुंडेंनंतर सदाभाऊ खोत, परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरखे या चार नेत्यांना देखील भाजपकडून विधान परिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. 

हे ही वाचा : गॅस सिलिंडरच्या दरात कपात, महाराष्ट्रात नवे दर किती?

 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

भाजपने विधान परिषदेसाठी 10 नावे केंद्राला पाठवली होती. यामध्ये पंकजा मुंडे,अमित गोरखे, परिणय फुके, सुधाकर कोहळे, योगेश टिळेकर, निलय नाईक, हर्षवर्धन पाटील, रावसाहेब दानवे, चित्रा वाघ, माधवीताई नाईक आणि मित्र पक्ष महादेव जानकर यांची नावे होती. या नेत्यांमधून पंकजा मुंडे आणि महादेव जानकर यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. यापैकी पंकजा मुंडे यांनी उमेदवारी जाहीर झाली आहे. आणि सदाभाऊ खोत, परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरखे या चार नेत्यांना देखील भाजपकडून विधान परिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. 

हे ही वाचा : Vidhan Sabha election : जानकरांनी महायुतीची वाढवली चिंता, भाजप कसा काढणार तोडगा?

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवाजीराव गर्जे आणि राजेश व्हिटेकर यांच्यापैकी एकाच्या नावावर शिक्कामोर्तब होईल. तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून लोकसभेत अन्याय झालेल्या भावना गवळी, हेमंत पाटील आणि कृपाल तुम्हाणे यांना संधी मिळण्याची शक्यता. तर माजी आमदार मनीषा कायंदे, किरण पावसकर आणि शिवसेना सचिव संजय मोरे यांची नावंही शर्यतीत आहे.

ADVERTISEMENT

महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार 

काँग्रेसकडून अल्पसंख्यांक चेहऱ्याला संधी देण्याचा विचार आहे. कांदिवलीतून पराभूत झालेले नसीम खान यांचं नाव चर्चेत आहे. शरद पवार गटातून तरुण चेहरा देण्यावर भर होता. मात्र शेकापच्या जयंत पाटील यांना पाठिंबा देण्याबाबत वरिष्ठांचं एकमत झाल्याचं कळतंय तसेच शिवसेना ठाकरे गटाकडून अमरावती संपर्क प्रमुख सुधीर सूर्यवंशी आणि नागपुरातील तरुण उद्योजक अंडी संजय राऊत यांचे निकटवर्तीय जयदीप पेंडके यांच्या नावाची चर्चा आहे. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT