'उद्धव ठाकरेंनी काहीही केलं नाही', डोंबिवली स्फोटावर फडणवीस ठाकरेंवर चिडले

योगेश पांडे

ADVERTISEMENT

डोंबिवली स्फोटावर फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
डोंबिवली स्फोटावर फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
social share
google news

Devendra Fadnavis: नागपूर: डोंबिवलीमधील कंपनीतील बॉयलर स्फोटामुळे अनेकांना हकनाक जीव गमवावे लागले आहेत. पण याच घटनेवरून राजकारणाला सुरुवात झाली आहे. डोंबिवली एमआयडीसीमधील कंपन्या याच्या स्थलांतरावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता उद्धव ठाकरेंवरच निशाणा साधला आहे. (uddhav thackeray did nothing devendra fadnavis targets thackeray over dombivli company blast)

ADVERTISEMENT

डोंबिवली एमआयडीसीमधील कंपन्या स्थलांतरित करण्याचा निर्णय हा ठाकरे सरकार असताना घेण्यात आला होता. पण याच सत्ताबदल झाल्यानंतर या निर्णयावर कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचं विरोधी पक्षाने आरोप केले आहेत. त्याच आरोपाला उत्तर देताना फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांनाच जबाबदार धरलं आहे.

डोंबिवलीतील कंपनीमध्ये स्फोट, फडणवीस नेमकं काय म्हणाले?

'कुठलेही उद्योग हे एका दिवसात हलवले जाऊ शकत नाही. हे उद्योग हलवले गेले पाहिजेत या संदर्भात बऱ्याच वर्षांपासून चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरेंनी याकरिता काहीही केलेलं नाही. मला त्यांनी केलेला फाईलवरचा.. एक निर्णय दाखवा. की, त्यांनी फाइल पुढे सरकवली आहे.. असा एक निर्णय दाखवा. काही केलेलं नाही.' 

'मला असा असं वाटतं की, घटनेचं गांभीर्य लक्षात घेतलं पाहिजे. या सगळ्या उद्योगांना पर्यायी जागा दिली पाहिजे त्यासाठी निश्चितपणे सरकार पुढाकार घेईल.' असं फडणवीस यावेळी म्हणाले.

हे वाचलं का?

हे ही वाचा>> "...तर भाजपला फायदा झाला असता", CSDS संचालकांनी मांडला नेमका मुद्दा

त्यामुळे आता या प्रकरणी सत्तेत असणाऱ्या सरकारकडून उद्धव ठाकरेंना टार्गेट करत असल्याचं पाहायला मिळतं. याच टीकेला आता उद्धव ठाकरे किंवा त्यांचा पक्ष शिवसेना (UBT) कशा पद्धतीने प्रत्युत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

नेमकी घटना काय?

डोंबिवलीच्या एमआयडीसीमधील कंपनीत काल (23 मे)  भीषण स्फोटाची घटना घडना घडली. या स्फोटात आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे तर 64 कामगार जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या जखमी कामगारांना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या स्फोटाची तीव्रता इतकी भयानक होती की, कंपनीच्या नजीकच्या अनेक इमारतीच्या काचा फुटल्या आणि परिसरात काळ्याकुट्ट धुरांचे लोण पसरलेले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अनेक तासांच्या प्रयत्नानंतर अखेर ही आग आटोक्यात आली होती.

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> "मविआचा महायुतीला फटका बसेल"; शिंदेंच्या नेत्याचा अंदाज

डोंबिवली एमआयडीसीतील फेज 2 मध्ये असलेल्या अमुदान या हार्डनर बनवणाऱ्या कंपनीतील रिॲक्टरचा दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास भीषण स्फोट होऊन मोठी आग लागली होती. हा स्फोट इतका भयानक होता की त्यामुळे शेजारील कंपन्या, दुकाने आणि रहिवासी इमारतीचे मोठे नुकसान झाले. शेजारील कंपन्यांमध्ये आग पसरून त्यांचेही बरेच नुकसान झाले.

ADVERTISEMENT

यातील जखमींवर एम्स आणि नेपच्युन या खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असल्याचे समजते. तर अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची नावे अद्याप समजू शकलेली नाही.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT