Datta Dalvi : “…या नालायकीस काय म्हणायचे?”, ठाकरेंचा शिंदेंवर पुन्हा वार
Latest News of Uddhav Thackery and Eknath shinde : मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांना अटक झाली. त्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आक्रमक झाली आहे. याच प्रकरणावरून ठाकरेंच्या सेनेने सामनातून शिंदेंवर प्रहार केला. वाचा नेमकं काय म्हटलं आहे?
ADVERTISEMENT
Uddhav Thackeray Eknath Shinde Shiv Sena : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेते आणि मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांना अटक झाल्यानंतर ठाकरे गटाने पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर वार केला. ठाकरेंच्या सेनेने पुन्हा एकदा नालायक म्हणत हल्ला चढवला आहे.
ADVERTISEMENT
उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर टीका करताना नालायक शब्द वापरला, तर दत्ता दळवींनी थेट अर्वाच्य शब्दांत टीका केली. दळवींना अटक करण्यात आली. या दोन्ही प्रकरणांवर सामना अग्रलेखातून भाष्य करण्यात आले आहे. ‘नालायकांचे सच बोलो!’ या मथळ्याखाली संपादकीयातून शिंदेंबरोबरच भाजपलाही लक्ष्य करण्यात आले आहे.
एकनाथ शिंदेंवर बाण, भाजपला सुनावले; वाचा सामना अग्रलेखात काय?
– “तुका म्हणे ऐशा नरा।
मोजुनी माराव्या पैजारा।।
–संत तुकाराम
तुकारामांनी हे जे सांगितले ते समाजातील नालायक किंवा भुरटय़ा लोकांविषयी सांगितले, पण तुकाराम महाराज आज असते तर महाराष्ट्रातील ‘मिंधे’ सरकारने त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांची रवानगी देहू पोलीस स्टेशनच्या कोठडीत केली असती; कारण सत्य आणि परखड बोलणे हा आता दंडनीय अपराध झाला आहे.”
हे वाचलं का?
हेही वाचा >> थेट शिंदेंनाच ललकारलं, कोण आहेत बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक दत्ता दळवी?
– “चोरांना चोर म्हणायचे नाही, गद्दारांना गद्दार म्हणायचे नाही. त्यांना युगपुरुष, महात्मा, धर्मात्मा म्हणा, असे राज्यातील मिंधे सरकारचे फर्मान आहे. यातील काही जणांची स्वतःला हिंदुहृदयसम्राट म्हणवून घेण्यापर्यंत मजल गेली आहे. राज्य एक प्रकारे सामाजिक, सांस्कृतिक बाबतीत अधोगतीस जात आहे.”
नालायक नाही म्हणायचे तर काय म्हणायचे? ठाकरेंच्या सेनेचा सवाल
– “शेतकरी बांधावर बसून धाय मोकलून रडत असताना राज्याचे ‘मिंधे’ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री वगैरे राजस्थान, तेलंगणा, मध्य प्रदेशात निवडणूक प्रचारासाठी गेले. या नालायकीस काय म्हणायचे? स्वतःचे घर असे वाऱ्यावर सोडून इतर राज्यांतील भाजपाईंना खोके पोहोचविण्यात धन्यता मानणाऱयांना ‘नालायक’ नाही म्हणायचे तर काय म्हणायचे?”
ADVERTISEMENT
हेही वाचा >> Datta Dalvi : ठाकरेंच्या नेत्याला घरातून अटक, शिंदेंवर काय केली होती टीका?
– “सरकारच्या नालायकीवर हल्ला केल्याबद्दल ‘गद्दार’ हृदयसम्राटांचे लोक उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाईची मागणी विनम्रपणे करतात. असे हे कलियुगातील खेळ चालले आहेत. महर्षी वाल्मीकींनी सांगितले आहे की, ‘नालायक व नीच लोकांची नम्रता अत्यंत क्लेशदायक, तितकीच घातक असते. धनुष्य, विषारी साप आणि मांजर खाली झुकून वार करतात, तेव्हा अशा ‘विनम्र’ घातक्यांपासून सावधान!’ राज्यातील सत्तेत असलेल्या नालायकांचे सध्याचे विनम्र भाव असेच धोकादायक आहेत.”
ADVERTISEMENT
– “मुंबईचे माजी महापौर व शिवसेनेचे उपनेते दत्ता दळवी यांना बुधवारी सकाळी पोलिसांनी घरात घुसून अटक केली. ‘श्री. आनंद दिघे यांनी गद्दारी करणाऱया ठाण्यातील मिंध्यांना चाबकाने फोडून काढले असते,’ असे दत्ता दळवी एका मेळाव्यात म्हणाले. स्वतःला हिंदुहृदयसम्राट म्हणवून घेण्याची यांची लायकी आहे काय?’ हा दळवींचा सवाल आहे व त्याबद्दल पोलिसांनी त्यांना अटक केली. मग त्याच ‘भोसऑऑऑ’ या उपाधीचा वापर केल्याबद्दल ‘धर्मवीर’ चित्रपटाचे निर्माते, दिघे यांची भूमिका करणारे नटवर्य, त्या चित्रपटाचे आर्थिक आश्रयदाते यांच्यावरही गुन्हे दाखल करून पोलीस त्यांना अटक करतील काय?”
बेकायदेशीर सरकारचे नालायक राज्य; शिवसेनेचा (UBT) वार
– “शिवसेना अशा सूडाच्या कारवायांमुळे मागे हटणार नाही. नालायक सरकारला खड्ड्यात गाडून त्यावर भगवा झेंडा फडकवूनच ती पुढे जाईल. अब्दुल सत्तार या मंत्र्याने सुप्रिया सुळे यांच्याबाबत अत्यंत नीच पातळीची भाषा वापरूनही त्या सत्तारांवर गुन्हा नाही. गुंड-खुन्यांचे फोटो गद्दार हृदयसम्राटांच्या चिरंजिवांसोबत जाहीरपणे झळकतात, त्यावर कारवाई नाही. मिरवणुकांत गोळीबार करणाऱ्यांना अभय देऊन त्यांना पुन्हा सिद्धिविनायक चरणी ‘विश्वस्त’ मंडळाचे अध्यक्ष केले जाते. मागठाण्याच्या आमदाराच्या दिवटय़ा चिरंजीवाने हाती पिस्तूल घेऊन एका बिल्डरास किडनॅप करूनही तो मोकळा आहे. असे हे महाराष्ट्रात बेकायदेशीर सरकारचे नालायक राज्य आहे.”
– “कोणी एक बागेश्वरबाबा, संत तुकाराम, साईबाबांपासून श्रीरामांपर्यंत सगळ्यांची यथेच्छ बदनामी करतो, त्या ‘बाबा’वर गुन्हा नोंदविण्याचे सोडा, पण येथील नालायक सरकार व भाजप त्याच्या चरणी लीन होते. हे आश्चर्यच नाही काय?”
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT