Vidhan Parishad Election 2024: BJP आमदार गणपत गायकवाड तुरुंगातून आले मतदानाला, पण कोणामुळे वेटिंगवर?

ऋत्विक भालेकर

ADVERTISEMENT

गणपत गायकवाड तुरुंगातून थेट आले मतदानाला (फाइल फोटो)
गणपत गायकवाड तुरुंगातून थेट आले मतदानाला (फाइल फोटो)
social share
google news

बातम्या हायलाइट

point

तुरुंगात असलेले भाजप आमदार आले मतदानाला

point

गणपत गायकवाड यांना मतदानासाठी कोर्टाची परवानगी

point

विरोधकांनी घेतली हरकत, गणपत गायकवाड मतदानासाठी वेटिंगवर

Vidhan Parishad Election 2024 BJP MLA Ganpat Gaikwad Voting: मुंबई: शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या पदाधिकाऱ्यावर केलेल्या गोळीबार प्रकरणी नवी मुंबईच्या तळोजा तुरुंगात असलेले भाजपचे आमदार गणपत गायकवाड हे आज (12 जुलै) त्यांचा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी विधानभवनात पोहचले. पण यावरूनच आता विरोधकांनी भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला. भाजप सत्तेचा दुरुपयोग करत असल्याचा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. (vidhan parishad election 2024 bjp mla ganpat gaikwad came directly from jail to vote but he is on waiting after objection from opponents) 

गणपत गायकवाड यांनी शिवसेना पदाधिकारी महेश गायकवाडांवर गोळीबार केला होता. ज्याचे व्हिडिओ देखील समोर आले होते. याच प्रकरणी मागील काही महिन्यांपासून गणपत गायकवाड हे अटकेत असून त्यांना तळोजा तुरुंगात ठेवण्यात आलं आहे. 

गणपत गायकवाड मतदानाला आले पण सध्या वेटिंगवर...

दरम्यान, आज विधानपरिषद निवडणुकीसाठी मतदान होत असल्याने कोर्टाची परवानगी घेऊन गणपत गायकवाड हे थेट विधीमंडळ परिसरात आले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Vidhan Parishad Election: कोणासोबत होणार दगाफटका? आमदारांची मतं कोणाला बनवणारं आमदार?

यानंतर विरोधकांनी गणपत गायकवाड यांच्या मतदानावर आक्षेप घेतला असून त्याबाबत काँग्रेसच्या वतीने तात्काळ निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे गणपत गायकवाड यांना मतदानासाठी वेटिंगवर ठेवण्यात आलं आहे. राज्य निवडणूक आयोग हे या मुद्द्यावरून सध्या केंद्रीय निवडणूक आयोगाशी चर्चा करत आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतरच गणपत गायकवाडांना मतदान करता येणार आहे.

'मी जेलमध्ये मला परवानगी दिली नाही', अनिल देशमुखांनी भाजपला घेरलं!

दरम्यान, याच मुद्द्यावरून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, 'अनिल देशमुखांसाठी वेगळा न्याय आणि गणपत गायकवाडांसाठी वेगळा न्याय.. गणपत गायकवाड यांना खालच्या कोर्टाने परवानगी दिली आहे. पण जेव्हा मी परवानगी मागितली होती तेव्हा मला दिली नव्हती. त्यामुळे कशा पद्धतीने भाजप सत्तेचा दुरुपयोग करतंय हे यातून सिद्ध होतंय.' असं म्हणत अनिल देशमुखांनी गायकवाडांच्या मतदानावरून टीका केली आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Vidhan Parishad Election 2024: 11 जागा, 12 उमेदवार... विधान परिषद निवडणुकीत आज कोणाचा होणार गेम? 

संजय राऊतांचीही भाजपवर थेट टीका

'गणपत गायकवाड तुरुंगातून मतदानासाठी येऊ शकतात. पण अनिल देशमुख हे जेव्हा तुरुंगात होते त्यांना मतदानासाठी येऊ दिलं नाही किंवा नवाब मलिकांना येऊ दिलं नाही. पण गणपत गायकवाड येऊ शकतात.. यालाच म्हणतात सत्तेचा वापर किंवा गैरवापर..' असं म्हणत संजय राऊतांनीही भाजपवर निशाणा साधला. 

ADVERTISEMENT

भाजपकडून पाठराखण

'यापूर्वी त्यांनी सुद्धा जेलमध्ये असलेल्या व्यक्तींना आणून मतदान घेतलेलं आहे. अशी उदाहरणं महाराष्ट्राने विधानपरिषद निवडणुकीत सातत्याने आपण पाहतोय. आता नावं घेण्याची आवश्यकता नाही. आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण उगीच काही तरी बोलायचं, नरेटीव्ह सेट करायचं.. एवढंच काम आहे. कारण त्यांना भीती आहे की, त्यांचे किती मतदान फुटतात, काय होतं काय नाही.. त्यामुळे या भीतीपोटी त्यांची अशी वक्तव्यं सुरू आहेत.' अशी प्रतिक्रिया भाजप आमदार संजय कुटे यांनी यावेळी दिली आहे.

 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT